नक्की लक्षात ठेवा! बॅंका 3 दिवस तर कृषी उत्पन्न बाजार समिती 4 दिवस राहणार बंद; पुढील आठवड्यात दिवाळीच्या सार्वजनिक सुट्या; खरेदी-विक्री कार्यालयांनाही सुट्टी

दिवाळीनिमित्त १ ते ३ नोव्हेंबर असे ३ दिवस सुट्या असणार आहेत. ३१ ऑक्टोबरला जिल्हाधिकाऱ्यांनी जाहीर केलेली सार्वजनिक सुटी आहे. त्यामुळे १ ते ३ नोव्हेंबरपर्यंत बॅंका तर बाजार समिती व मुद्रांक शुल्क विभागाची कार्यालये ३१ ऑक्टोबर ते ३ नोव्हेंबरपर्यंत बंद राहणार आहेत.
Diwali 2024
Diwali 2024 esakal
Updated on

सोलापूर : दिवाळी सणानिमित्त १ ते ३ नोव्हेंबर असे तीन दिवस सार्वजनिक सुट्या असणार आहेत. तर ३१ ऑक्टोबरला जिल्हाधिकाऱ्यांनी जाहीर केलेली सार्वजनिक सुटी आहे. त्यामुळे १ ते ३ नोव्हेंबरपर्यंत बॅंका तर बाजार समिती व मुद्रांक शुल्क विभागाची कार्यालये ३१ ऑक्टोबर ते ३ नोव्हेंबरपर्यंत बंद राहणार आहेत.

सध्या विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून, २९ ऑक्टोबरपर्यंत उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत आहे. त्यानंतर ३० ऑक्टोबरला उमेदवारी अर्जांची छाननी आहे. ३१ ऑक्टोबर ते ४ नोव्हेंबरपर्यंत उमेदवारी अर्ज माघारीची मुदत आहे. ३१ ऑक्टोबरला जिल्हाधिकाऱ्यांनी जाहीर केलेली सुटी आहे, पण त्या दिवशी उमेदवारी अर्ज मागे घेता येणार आहे.

दुसरीकडे मात्र ३१ ऑक्टोबरपासून ३ नोव्हेंबरपर्यंत बॅंका, बाजार समिती व मुद्रांक शुल्कची कार्यालये बंद असणार आहेत. त्यामुळे जागा, जमीन, घर खरेदी- विक्रीचे व्यवहार पुढील तीन दिवसांत करावे लागतील. तर बॅंकांचीही कामे दिवाळीपूर्वी करावी लागणार आहेत. कारण, ३० ऑक्टोबरनंतर शासकीय कार्यालये व बाजार समिती थेट सोमवारीच (४ नोव्हेंबर) सुरू होईल. गुरुवार ते रविवारपर्यंत बाजार समितीलाही सुटी असल्याने शेतकऱ्यांनी या काळात आपला शेतमाल घेऊन येऊ नये, असे बाजार समितीने कळविले आहे. बॅंका मात्र ३१ ऑक्टोबरला सुरू राहणार आहेत. बॅंकांना १ ते ३ नोव्हेंबरपर्यंत सुट्या आहेत.

बाजार समितीतील व्यवहार राहतील बंद

गुरुवारी (ता. ३१) नरक चतुर्दशी असल्याने त्या दिवशी कृषी उत्पन्न बाजार समिती बंद राहणार आहे. याशिवाय शुक्रवारी (ता. १) लक्ष्मीपूजन, २ नोव्हेंबरला (शनिवारी) बलिप्रतिपदा म्हणजेच दीपावली पाडवा असून, रविवारी (ता. ३) भाऊबीज आहे. त्यामुळे ३१ ऑक्टोबर ते ३ नोव्हेंबर असे चार दिवस बाजार समितीतील सर्व व्यवहार बंद राहणार आहेत, अशी माहिती प्रशासक मोहन निंबाळकर यांनी दिली.

खरेदी-विक्री कार्यालयेही चार दिवस बंद

यंदा दिवाळी उत्सवाची सुरवात ३१ ऑक्टोबरपासून होत असून, त्या दिवशी जिल्हाधिकाऱ्यांनी जाहीर केलेली सुटी आहे. त्यानंतर सलग तीन दिवस दिवाळीनिमित्त सार्वजनिक सुट्या असणार आहेत. या चार दिवसांत सुट्यांमुळे मुद्रांक शुल्क विभागाची कार्यालये बंद राहणार असून त्यामुळे खरेदी-विक्रीचे व्यवहारही बंद राहणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.