Pankaja Munde: जगात एकाच व्यक्तीला खूप घाबरते, पंकजा मुंडेंचा मोठा खुलासा

मला माझ्या युवा मोर्चाचे कार्यकर्ते हिरोच म्हणतात, हिरोईन म्हणतच नाहीत.
Pankaja Munde
Pankaja Mundeesakal
Updated on

भाजप नेत्या पंकजा मुंडे नेहमी या ना त्या कारणाने चर्चेत असतात. दरम्यान, त्यांनी त्यांच्यासंदर्भात मोठा खुलासा केला आहे. एका कार्यक्रमात पंकजा मुंडे यांनी केलेलं वक्तव्य सध्या चर्चेत आले आहे.(Beed Pankaja Munde Big reveal)

आपण जगात कुणालाच घाबरत नाही, पण मी माझ्या मुलाला खूप घाबरते, असं पंकजा मुंडे यांनी एका कार्यक्रमात केले. यावेळी त्यांनी यामागचं कारणही सांगितलं.

भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी अंबाजोगाई येथील विद्यार्थ्यांशी संवाद साधला. यावेळचा त्यांचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

काय म्हणाल्या पंकजा मुंडे?

जाहीर कार्यक्रमात पंकजा मुंडे युवकांना संबोधित करत होत्या. माझा मुलगा २१ वर्षाचा आहे, त्यामुळे मला कळत नाही की तुमच्याशी कसं बोलावं. त्याला बोलताना पण मी खूप घाबरते. या जगात मी कुणालाच घाबरत नाही, पण माझ्या मुलाला ‘आर्यामन’ला मी खूप घाबरते. तसेच, मला माझ्या युवा मोर्चाचे कार्यकर्ते हिरोच म्हणतात, हिरोईन म्हणतच नाहीत. असही पंकजा मुंडे म्हणाल्या.

कारण तुमची बुद्धी एवढी तीक्ष्ण आणि तीव्र आहे की, त्यामुळे तुमच्यासोबत वाद घालण्यात काहीही अर्थ नसतो. तुमच्या उत्तरामुळे आम्हीच बुचकाळ्यात पडतो. त्यामुळे आम्हालाच प्रश्न पडतो की, आता याला काय उत्तर द्यायचं. त्यामुळे तुमच्यासमोर येणं माझ्यासाठी फार आनंदाची, अभिमानाची आणि तेवढीच जबाबदारीची गोष्ट आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.