Sanjay Raut on Chandrashekhar Bawankule's Son- नागपूरमध्ये हिट अँड रनची घटना घडली आहे. यात भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावळकुळे यांच्या मुलाचे नाव घेतले जात आहे. ऑडी कारने चार ते पाच वाहनांना धडक दिली होती. याप्रकरणी गाडीचा चालक मद्य प्राशन करून होता, असा दावा केला जात आहेत. या मुद्द्यावरून राजकारण तापलं आहे. खासदार संजय राऊत यांनी याप्रकरणी प्रतिक्रिया दिली आहे.
लाहोरी बार मधील जे बिल मिळाले आहे त्याच्यावरती खाण्याचे पिण्याचे जे बिल आहे ते बिल लोकांसमोर आणले पाहिजे. त्याच्यामध्ये दारूचे बिल आहे. आम्हाला हे कसलं हिंदुत्व शिकवतात? चिकन मटन आणि त्याबरोबर बीफ कटलेट ह्याचे देखील बिल त्याच्यात आहे. गोमांस खाणारे आम्हाला हिंदुत्व शिकवतात, असं म्हणत राऊतांनी मोठा दावा केला आहे.
दारूचं बिल आहे, नॉनव्हेज खाण्याचं बिल आहे, बिफ कटलेट खाण्याचं देखील बिल आहे. कोण काय खायला हवं हे मी सांगत नाही. बिफ खाण्यामुळे तुम्ही लोकांचे मॉब लिचिंग करता, मुस्लिमांचे लिचिंग करता. पण, तुमच्या बिलामध्ये बिफ कटलेचा उल्लेख आहे. याबाबत भाजपला उत्तर द्यावं लागेल. तुम्ही सगळं करता आणि दुसऱ्यांचा जीव घेता, असं म्हणत संजय राऊत यांनी हल्लाबोल केला आहे.