Maharashtra Politics: 'पक्षाने पोरकेपणात सावली दिली नाही', राष्ट्रवादी सोडण्याआधी नेत्याने व्यक्त केली खंत

राष्ट्रवादीचे नेते भगीरथ भालकेंचा उद्या ‘बीआरएस’मध्ये प्रवेश
Maharashtra Politics
Maharashtra PoliticsEsakal
Updated on

स्व. भारतनानांच्या जाण्याने आमच्या कुटुंबाचे व मतदारसंघाचे छत्र हरपले होते. अशा परिस्थितीत राजकीय पोरकेपणा दूर करण्यासाठी राजकीय सावली द्यायची सोडून पक्षाने वेगळी दिशा दाखवण्याचे काम केल्यामुळे स्वाभिमान जिवंत ठेवण्यासाठी पक्ष बदलाचा निर्णय तुमच्या बरोबरीने घेत आहे, असं वक्तव्य भगीरथ भालके यांनी केले.(Latest Marathi News)

भविष्यातील राजकीय वाटचाली संदर्भात येथील विचारविनिमय बैठकीत ते बोलत होते. यावेळी ‘दामाजी’चे उपाध्यक्ष तानाजी खरात, संचालक मुरलीधर दत्तू, दयानंद सोनगे, बसवराज पाटील, भारत बेदरे, रामभाऊ वाकडे, ज्ञानेश्वर भगरे, भारत नागणे, सुनील डोके, दादा पवार, नितीन पाटील, महादेव फराटे, दत्तात्रय कांबळे, गुलाब थोरबोले, काका डोंगरे, संदीप फडतरे आदींसह भालके समर्थक उपस्थित होते. (Latest Marathi News)

Maharashtra Politics
Maharashtra Politics: राष्ट्रवादीला अखेर खिंडार पडलं! भगीरथ भालकेंचा पक्षाला रामराम म्हणाले, 'राष्ट्रवादीने पोरकेपणात...'

यावेळी भालके म्हणाले, सुरवातीच्या काळात रिडालोसबद्दल राज्यकर्त्यांच्या ज्या भावना होत्या, त्याच भावना आज आहेत. पण ज्या मतदारांनी ३८ हजारांचे मताधिक्य देत विधानसभेत पाठवले, कागदावर नसलेले दोन टीएमसी पाणी प्रत्यक्षात कागदावर आणले, पाण्यासाठी तीन महिने मतदार व कुटुंबापासून दूर जात बहिणीच्या अंत्यविधीलाही न येता भारतनानांनी पाण्याला मंजुरी आणली. स्व. नाना कोणत्याही पक्षात असले तरी राष्ट्रवादीच्या नेत्यांवर श्रद्धा ठेवली.(Latest Marathi News)

राष्ट्रवादीच्या नेत्यांवर जिल्ह्यात कुणीही विरोधी भूमिका मांडल्यास पहिल्यांदा त्यावर प्रत्युत्तर देण्याचे काम नानांनी केले. त्यामुळे अडचणीच्या काळात राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांकडून आधार, आपुलकी आणि प्रेमाची गरज होती. प्रतिकूल परिस्थितीत कारखान्याला मदत मागितली, पण ही मंडळी मदत करू शकली नाहीत. एमएससी बँकेचा प्रमुख सरकारचा ऐकत नाही.(Latest Marathi News)

Maharashtra Politics
BRSला रोखण्यासाठी CM शिंदेंनी उचललं पाऊल; के. चंद्रशेखर राव यांच्याआधीच पोहचले विठुरायाच्या दर्शनाला

तेलंगणचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी माझ्याशी सातत्याने संपर्कात राहून आधार देण्याचे काम केले. त्यामुळे आगामी काळात ग्रामपंचायत, नगरपालिका व जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुका पूर्ण ताकदीने लढवणार आहे. या ताकदीनंतरच मी विधानसभेच्या निवडणुकीला सामोरे जाणार आहे आणि हे मी मोकळे बोलत नाही, ते तुम्हाला त्या निवडणुकीत दिसून येईल.(Latest Marathi News)

यावेळी नितीन पाटील, गुलाब थोरबोले, सिद्धेश्‍वर दसाडे, मनोहर कवचाळे यांनी मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक माजी सभापती संभाजी गावकरे यांनी केले.

Maharashtra Politics
Mumbai Rains : मातोश्रीच्या बाहेरच्या डबक्यात कागदी होड्या सोडायच्या वयात हे…; भाजपकडून आदित्य ठाकरेंची खिल्ली

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()