बहुचर्चित असा TET घोटाळा पुन्हा एकदा चर्चेत आलाय. कारण या घोटाळ्याप्रकरणी शिक्षण परिषदेने जी यादी जाहीर केली आहे. यात ७८८० विद्यार्थी आहेत आणि त्यात अब्दुल सत्तारांच्या चारही मुलांची नाव समोर आली आहे. या मुलांची प्रमाणपत्र रद्द करण्यात आली आणि त्यांना इथून पुढे परीक्षेला बसण्यास मनाई केली गेलीये. (TET Scam - Abdul Sattar)
या प्रकरणामुळे अब्दुल सत्तार मोठ्या अडचणीत सापडेलत, माझी मुलं परीक्षेला होती, मात्र ती अपात्र ठरलेत त्यामुळे याचा काहीही संबंध नाही असं स्पष्टीकरण सत्तारांनी दिली. मात्र विरोधकांनी हे प्रकरण चांगलाच उचलून धरलंय. पण तुम्हाला माहिती आहे का की याआधी आपल्या मुलीला मार्क वाढवून दिले म्हणून एका मुख्यमंत्र्याला राजीनामा द्यावा लागला होता.
१९८६ - ८७ सालाची गोष्ट आहे. राज्यात काँग्रेसचे सरकार होते, आणि शिवाजीराव निलंगेकर पाटील हे या सरकारमध्ये मुख्यमंत्री होते. निलंगेकरांमुळे मराठवाड्याला दुसऱ्यांदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपद मिळाले होते. तसा पाटलांचा राजकारणात मोठा दबदबा होता. दरम्यान मुख्यमंत्री असताना निलंगेकरांवर आरोप झाले की, मुलीला मेडिकल कॉलेजात ऍडमिशन घ्यायचं होतं. म्ह्णून मार्कशीटवर दोन मार्क्स वाढवून देण्यात आले. त्यावेळी शरद पवार हे विरोधी पक्षात होते, त्यांनीच हा मुद्दा उचलून धरला होता.
हे प्रकरण चांगलंच गाजलं होत. जे थेट मुंबई उच्च न्यायालयात पोहोचलं, यावेळी कोर्टाने निलंगेकरांना खडेबोल सुनावले होते. त्यामुळे त्यांच्यावर सगळीकडूनचं टीका झाली होती, पक्षाची प्रतिमा मलीन केली म्हणून दिल्ली हायकमांड देखील त्यांच्यावर नाराज होत. प्रकरण इतकं तापलं कि, सगळीकडूनच अपमान सहन करावा लागलेल्या निलंगेकरांनी थेट आपल्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला होता.
- अक्षता पांढरे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.