Belgaum : सीमा भागातल्या लोकांची नाराजी, महाराष्ट्र सरकारने एकटं पाडल्याची भावना

आज बेळगावमध्ये काळा दिवस पाळला जात आहे.
Belgaun Black Day
Belgaun Black DaySakal
Updated on

बेळगावातला सीमा प्रश्न गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. दरवर्षी १ नोव्हेंबर रोजी बेळगावमध्ये काळा दिवस साजरा केला जातो. याच दिवशी महाराष्ट्रातून आपल्याकडे राजकीय नेत्यांचं दुर्लक्ष झाल्याची भावना व्यक्त केली जात आहे. तसंच नेत्यांनी आपल्याकडे पाठ फिरवल्याने इथल्या नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.

Belgaun Black Day
बेळगाव : सीमाभागात उद्या काळा दिन, मराठी भाषिक उतरणार रस्त्यावर

महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेपासून बेळगाव, निपाणी, बिदरसह ८६५ गावं संघर्ष करत आहेत. बेळगावसह संयुक्त महाराष्ट्र व्हावा, अशी मागणी इथले नागरिक करत आहेत. त्याच पार्श्वभूमीवर आज कर्नाटक दिनादिवशी काळा दिवस पाळला जातो. मात्र या दिवशी महाराष्ट्र सरकारमधून एकही मंत्री किंवा नेता इथे फिरकला नाही. त्यामुळे सीमा भागातल्या बांधवांना वाऱ्यावर सोडल्याची भावना व्यक्त केली जात आहे.

Belgaun Black Day
PHOTO : बाबा, मला महाराष्ट्रात जायचंय! चिमुकल्याच्या बॅनरनं वेधलं लक्ष; मराठी भाषिक आक्रमक

सीमा प्रश्नाविषयीचा लढा हा बेळगाव विरुद्ध कर्नाटक नसून महाराष्ट्र विरुद्ध कर्नाटक आहे. त्यामुळे त्याची जाण महाराष्ट्राने ठेवावी, अशी अपेक्षा इथल्या नागरिकांनी व्यक्त केली आहे. तसंच महाराष्ट्राने आपण सीमावासियांच्या पाठीशी आहोत, हे दाखवून देण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली आहे. १९६३ पासून १ नोव्हेंबर हा कर्नाटक स्थापनेचा दिवस दरवर्षी काळा दिवस म्हणून साजरा केला जातो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.