लाडक्या भावा-बहिणींना काम अन्‌ दरमहा ६ ते १० हजार रूपये! १८ ते ३५ वयाचे बारावी ते पदव्युतर पदवीपर्यंत शिकलेले लाभार्थी; योजनेच्या लाभासाठी ‘येथे’ करा नोंदणी

राज्य शासनाच्या मुख्यमंत्री-युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत आता १८ ते ३५ वयोगटातील लाडक्या भावा-बहिणींची ‘महास्वयंम’ पोर्टलवर नोंदणी सुरू झाली आहे. त्यासाठी संबंधित विद्यार्थ्यांना दरमहा सहा ते १० हजार रूपयांचे विद्यावेतन (सहा महिने) मिळणार आहे.
maharashtra government
maharashtra governmentsakal
Updated on

सोलापूर : राज्य शासनाच्या मुख्यमंत्री-युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत आता १८ ते ३५ वयोगटातील लाडक्या भावा-बहिणींची ‘महास्वयंम’ पोर्टलवर नोंदणी सुरू झाली आहे. त्यासाठी संबंधित विद्यार्थ्यांना दरमहा सहा ते १० हजार रूपयांचे विद्यावेतन (सहा महिने) मिळणार आहे. खासगी कंपन्यांमध्ये एकूण पदांच्या पाच टक्के, सेवा क्षेत्रातील उद्योगांमध्ये २० टक्के तर शासकीय-निमशासकीय कार्यालयांमध्ये पाच टक्के तरूण-तरूणींना योजनेअंतर्गत सहा महिन्यांचे प्रशिक्षण घेण्याची संधी मिळणार आहे.

जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी ‘मुख्यमंत्री- युवा कार्य प्रशिक्षण योजना’ प्रभावीपणे राबविण्याच्या अनुषंगाने मंगळवारी (ता. २३) बैठक घेतली. त्यावेळी त्यांनी सर्व उद्योजकांच्या संबंधित यंत्रणेने नियमित बैठका घ्याव्यात, योजनेचा प्रचार-प्रसार करावा, तसेच जिल्ह्यातील इंडस्ट्रीज असोसिएशन व सर्व शासकीय कार्यालये, महामंडळांसह गारमेंट इंडस्ट्रीजकडे उपलब्ध रिक्तपदांची संख्या ‘महास्वयंम’ पोर्टलवर नोंदणी करून घ्यावी, असे आदेश दिले. सर्व एमआयडीसींमध्ये जाऊन योजनेची माहिती विशेष कॅम्प घेऊन द्यावी, असेही सांगितले. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी मनीषा कुंभार, मुख्यमंत्री- युवा कार्य प्रशिक्षण योजनेचे नोडल अधिकारी तथा जिल्हा उद्योग केंद्र सोलापूरचे महाव्यवस्थापक संतोष कोलते, जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त हनुमंत नलावडे आदी उपस्थित होते. दरम्यान, योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी जिल्ह्यातील किती उद्योजक तयार होतात व त्यात दरवर्षी खरोखर एक लाखांपर्यंत विद्यार्थी त्यांच्या अभ्यासक्रमानुसार प्रशिक्षण घेवू शकतील का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

१८ ते ३५ वयोगटाला करता येईल अर्ज

जिल्ह्यातील जे विद्यार्थी किमान बारावी उत्तीर्ण आहेत, ज्यांचा आयटीआय किंवा डिप्लोमा झालाय त्यांच्यासह पदवी-पदव्युत्तर पदवीपर्यंत शिक्षण पूर्ण केलेल्या १८ ते ३५ वयोगटातील तरूण-तरूणींना या योजनेअंतर्गत नोंदणी करता येणार आहे. त्यांना संबंधित उद्योग किंवा खासगी, शासकीय-निमशासकीय कार्यालयांमध्ये सहा महिन्यांच्या अनुभवासाठी काम मिळणार आहे. त्याबदल्यात दरमहा त्यांना सहा ते दहा हजारांपर्यंत विद्यावेतन देखील दिले जाणार आहे. ज्या विद्यार्थ्यांची बारावी किंवा पदवी आठ-दहा वर्षांपूर्वी झाली आहे, पण त्यांचे वय ३५ पेक्षा कमी आहे त्यांनाही ‘महास्वयंम’वर नोंदणी करता येणार आहे.

‘महास्वयंम’वर अशी करता येईल नोंदणी

  • पहिल्यांदा मोबाइलमध्ये ‘महास्वयंम’ पोर्टल उघडा

  • त्यातील ‘जॉब सिकर’यावर करा क्लिक

  • त्यानंतर संबंधित विद्यार्थ्याने संपूर्ण माहिती भरावी

  • शैक्षणिक पात्रतेची कागदपत्रे अपलोड आणि आधार, मोबाइल क्रमांक टाकावा

  • मोबाइलवर ओटीपी आल्यानंतर तो सबमिट केल्यानंतर नोंदणी पूर्ण होईल

योजनेअंतर्गत ‘महास्वयंम’वर नोंदणी सुरू

जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्यमंत्री-युवा कार्य प्रशिक्षण योजनेची प्रभावी अंमलबजावणी होईल, यादृष्टीने नियोजन झाले आहे. लाभार्थी १८ ते ३५ वयोगटातील तरूण-तरूणींनी ‘महास्वयंम’ पोर्टलवर नोंदणी करणे अपेक्षित असून त्याच पद्धतीने खासगी उद्योग, कंपन्यांनाही त्याठिकाणी नोंदणी करावी लागेल. शासकीय-निमशासकीय कंपन्यांमध्ये, कार्यालयांमध्ये एकूण मंजूर पदांच्या पाच टक्के, खासगी कार्यालये, उद्योगांना दहा टक्के तर सेवा क्षेत्रातील उद्योगांमध्ये २० टक्के तरूण-तरूणी योजनेअंतर्गत घेणे अपेक्षित आहे.

- हनुमंत नलावडे, सहायक आयुक्त, जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, सोलापूर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.