शिवरायांच्या अवमानाचा ठाकरेंकडून निषेध; मोदींना केलं 'हे' आवाहन

बंगळुरुमध्ये शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना झाली होती
Uddhav Thackeray_Narendra Modi
Uddhav Thackeray_Narendra Modi
Updated on

मुंबई : बंगळुरुमध्ये (Bengaluru) छत्रपती शिवाजी महाराजांच्या (Shivaji Maharaj) पुतळ्याचा अवमान झाल्याच्या घटनेवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला आहेत. तसेच याप्रकरणी त्यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांच्याकडे तक्रार केली असून कर्नाटक सरकारला याबाबत कारवाईचे आदेश द्यावेत अशी मागणी केली. (Bengaluru Statue contempt CM Thackeray protests appeal PM take action)

मुख्यमंत्री म्हणाले, "बंगळुरूमधील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबनाप्रकरण अतिशय निंदनीय आहे. छत्रपती शिवाजी महाराज सगळ्या देशाचे दैवत आहेत. त्यांचा अवमान तर दूर, कणभर अनादरही खपवून घेणार नाही, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या घटनेबाबत निषेध व्यक्त केला आहे"

Uddhav Thackeray_Narendra Modi
समाजकंटकांकडून बंगळूरात शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना

"कर्नाटकातील मराठी जनतेवरील कानडी अत्याचार थांबवून या हिणकस, विकृत मनोवृत्तीचा बीमोड करण्यासाठी पंतप्रधानांनी स्वतः लक्ष घालावं. तसेच तेथील राज्य शासनाला त्वरित संबंधितांवर कडक कारवाई करण्यास सांगावे," अशी मागणी मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांकडे केली आहेत.

काय आहे प्रकरण?

बंगळुरुमधील सदाशिवनगर येथे छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याची विटंबना करण्यात आल्याची संतापजनक घटना घडली. समाजकंटकांनी गुरुवारी रात्री पुतळ्यावर काळा रंग ओतल्याने संतापाची लाट उसळली आहे. काही महिन्यांपासून छत्रपती शिवरायांबद्दल अपशब्द वापरण्याबरोबरच वेळोवेळी अवमानाचा प्रयत्न कर्नाटकात काही संघटना व समाजकंटकांकडून होत आहे. कारण चारच दिवसांपूर्वी महाराष्ट्रात लाल-पिवळ्याची ध्वजाची होळी केल्याने भगव्या ध्वजाचा अवमान करण्याचे काम काहींनी कर्नाटकात केले होते. या घटनेची पुढची प्रतिक्रिया म्हणून पुतळ्याची विटंबना झाल्याचं सांगण्यात येतंय. या घटनेचा व्हिडिओही व्हायरल झाला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()