Agriculture State Award: महाराष्ट्राला सर्वश्रेष्ठ कृषी राज्य पुरस्कार जाहीर! CM एकनाथ शिंदे स्वीकारणार ...

Agriculture State Award To Maharashtra: महाराष्ट्र राज्याला हा पुरस्कार शेती संदर्भात सरकारने सुरु केलेल्या नवीन योजना, शेतकऱ्यांच्या प्रगतीसाठी कृषी आणि ग्रामीण विकासासाठी सुरु केलेल्या योजनांसाठी दिला जात आहे.
Agriculture State Award
Agriculture State Awardesakal
Updated on

महाराष्ट्र राज्याला 15 व्या कृषी नेतृत्व पुरस्कार समितीने 2024 चा सर्वश्रेष्ठ कृषी राज्य पुरस्कार जाहीर केला आहे. भारताचे माजी सरन्यायाधीश आणि केरळचे राज्यपाल पी सदाशिवम यांच्या अध्यक्षतेखालील हा पुरस्कार जाहीर झाला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे 10 जुलैला नवी दिल्लीत हा पुरस्कार स्वीकारणार आहेत.

यावेळी केंद्रीय रस्ते परिवहन आणि राजमार्ग मंत्री नितिन गडकरी यांच्यासह कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान, ब्राझील, अल्जीरिया, नीदरलॅंड देशाचे राजदूत, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, हरियाणा, हिमाचल प्रदेश, नागालँड राज्यातील मंत्री देखील उपस्थित राहणार आहेत.

महाराष्ट्र राज्याला हा पुरस्कार शेती संदर्भात सरकारने सुरु केलेल्या नवीन योजना, शेतकऱ्यांच्या प्रगतीसाठी कृषी आणि ग्रामीण विकासासाठी सुरु केलेल्या योजनांसाठी दिला जात आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात 21 लाख हेक्टरवर बांबू लावण्याचं सर्वात मोठं मिशन हाती घेण्यात आलं आहे. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात 17 लाख हेक्टरवर कृषी सिंचन पाणी पोहोचण्यासाठी 123 योजना राबवण्यात आल्या आहेत. तसेच पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेची रक्कम दुप्पट करणार महाराष्ट्र हे देशातील पहिलं राज्य आहे. नॅनो तंत्रज्ञानद्वारे खतांचे वितरण करण्यासाठी 4.63 लाख शेतकऱ्यांना सरकारने मदत केली.

Agriculture State Award
​Devendra Fadnavis : सागरी सुरक्षेसाठी ११ महिन्यांकरिता कंत्राटी भरती;कोळी समाज व स्थानिक रहिवाशांना प्राधान्य देणार

2023 ला सर्वश्रेष्ठ कृषी राज्य पुरस्कार बिहारला तर 2022 तमिळनाडू आणि उत्तर प्रदेशला देण्यात आला होता. 2008 ला या पुरस्काराची सुरुवात डॉ. एमएस स्वामीनाथन यांच्या अध्यक्षतेखालील समितीत करण्यात आली होती. 2008 चा पुरस्कार आंध्रप्रदेशला देण्यात आला होता.

Agriculture State Award
Devendra Fadnavis: "रोहित शर्माकडून राजकारण्यांनी शिकावं..."; देवेंद्र फडणवीसांनी काय सल्ला दिला?

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.