सणसुदीच्या काळात घरातील भांडी, दाग-दागिने पॉलिश करून घेतले जातात. पण चोरट्यांसाठी हीच संधी ठरू लागलीय. कारण भांडी आणि दागिने पॉलिश करून देण्याच्या नावाखाली चोरट्यांनी जळगावात अनेकांना गंडा घातलाय. भांडी पॉलिशच्या नावाखाली हे चोरटे आधी घरात प्रवेश करतात. त्यानंतर दागिनेही पॉलिश करून देतो अशी बतावणी केली जाते. एकदा का घरातल्या महिलेचा विश्वास संपादित केला की, घरातून गरम पाणी किंवा एखादी वस्तू आणण्यास सांगितली जाते आणि तेव्हढ्या वेळात हातचलाखी दाखवून चोरटे दागिने लांबवू लागलेत.
महिलांना गंडा घालणारे चोरटे अतिशय शिताफीनं चोऱ्या करतायेत. आधी हे चोरटे एखाद्या घराची रेकी करतात. एकटी दुकटी महिला पाहून मग पॉलिश बहाण्यानं दागिन्यांवर हात साफ केला जातो.
अशी फसवणूक टाळायची असेल तर अनोळखी व्यक्तींना घरात प्रवेश देऊ नका. बाहेरच्या व्यक्तीकडे आपले दागिने पॉलिश करण्यासाठी देऊ नका. पॉलिशच्या नावाखाली हातचलाखीचा संशय आल्यास पोलिसांना त्याची माहिती द्या.
त्यामुळे दागिन्यांबाबत तुम्ही सजग राहा. भांडी किंवा दागिने पॉलिशसाठी एखादी अनोळखी व्यक्ती आग्रह धरत असेल तर सतर्क व्हा. अन्यथा तुमच्या डोळ्यात धुळफेक करून चोरटे तुम्हाला हातोहात गंडा घालू शकतात.
WebTitle : beware while polishing your gold or silver jewellery there is fraud clan active in maharashtra
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.