Bhalchandra Nemade : पुन्हा नेमाडे, पुन्हा वाद? कार्यक्रमाआधीच हिंदू महासंघाच्या कार्यकर्त्यांची धरपकड

Bhalchandra Nemade Aurangjeb
Bhalchandra Nemade AurangjebSakal
Updated on

मुंबईः जेष्ठ साहित्यिक भालचंद्र नेमाडे यांनी दोन दिवसांपूर्वी मुघल बादशहा औरंगजेबाबाबत मोठं वक्तव्य केलं होतं. त्यावरुन राज्यात बरीच चर्चा सुरु झाली आहे. आता

तसेच मुंबईत एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी धक्कादायक माहिती दिली. नानासाहेब पेशवे जेथे जात तेथे 8 ते 10 वर्षांच्या मुलीची मागणी करत होते. या मुली त्यांना कशासाठी लागायच्या हे मी सांगत नाही, असं ते म्हणाले आहेत. त्यांच्या या विधानामुळे वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

आता भालचंद्र नेमाडे यांचा एक कार्यक्रम मुंबईत होत आहे. अधांतर नाटकाच्या रौप्य महोत्सवानिमित्त 'अधांतर : भूमी व अवकाश' या ग्रंथाचा प्रकाशन समारंभ पार पडत आहे. या ग्रंथाचे प्रकाशन ज्येष्ठ साहित्यिक भालचंद्र नेमाडे यांच्या उपस्थितीत होणार आहे.

Bhalchandra Nemade Aurangjeb
Shiv Sena MLA Disqualification Case: आमदार अपात्रतेबाबत लवकरच फैसला! पुढच्या आठवड्यात सुनावणीला सुरुवात

भालचंद्र नेमाडे यांनी औरंगजेब आणि पेशव्यांबद्दल केलेल्या वक्तव्याबद्दल हिंदू महासंघाकडून विरोध करण्यात येणार होता. याप्रकरणी पोलिसांकडून विरोध करण्याआधीच आनंद दवेंसोबत काही जणांना ताब्यात घेतलं आहे. यासह खबरदारी म्हणून रविंद्र नाट्यमंदिराबाहेर मोठा पोलिस बंदोबस्त लावण्यात आला आहे. आज सायंकाळी या कार्यक्रमाचं आजोजन करण्यात आलेलं आहे.

Bhalchandra Nemade Aurangjeb
Ira Khan Reveals Her Wedding Date: ठरलं तर मग! आमिर खानची लेक 'या' दिवशी अडकणार लग्न बंधनात...

भालचंद्र नेमाडे औरंगजेबाबाबत बोलताना म्हणाले होते की, औरंगजेबाबद्दल चुकीचं सांगितलं जातंय, तो तसा नव्हताच. सर्वात आधी सती प्रथा बंद करणारा लॉर्ड बेंटिक नव्हता तर औरंगजेबाने सतीची प्रथा बंद केली. काशी-विश्वेश्वर येथील पंडितांकडून तरुण बायका भ्रष्ट केल्या जात होत्या. औरंगजेबाच्या दोन राण्या काशी विश्वेश्वराला गेल्या. त्या परत आल्या नाहीत. चौकशी केल्यासं कळालं की, तेथील पंडित तरुण बायकांना भूयारी मार्गतून नेऊन भ्रष्ट करायचे. औरंगजेबाला जेव्हा हे लक्षात आलं, तेव्हा त्याने ज्ञानवापीची मोडतोड केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.