Bharat Gogawale: पालकमंत्री पदाच्या स्पर्धेत गोगावले घसरले, अदिती तटकरेंबद्दल बोलताना केला महिलांचा अपमान

रायगडच्या पालकमंत्रीपदासाठी आग्रही असलेले शिवसेनेचे आमदार भरत गोगावले यांनी केलेलं वक्तव्य चर्चेत
 Bharat Gogawale
Bharat GogawaleEsakal
Updated on

राज्याच्या राजकारणात सध्या घडामोडींना वेग आला आहे. एकीकडे मंत्रिमंडळ विस्ताराच्या हालचाली सुरु आहेत, तर दुसरीकडे मंत्रीपदं आणि इतर पदांसाठी महायुतीमध्ये चढाओढ दिसुन येत आहे. तर अजित पवार गट, भाजप, शिंदे गटातील अनेक आमदारांची नावे मंत्रिपदासाठी चर्चेत आहेत. पण मंत्रीपद कोणाच्या पारड्यात पडणार हे पाहणंही महत्वाचं आहे. (Marathi Tajya Batmya)

तर यामध्ये महाडचे आमदार भरत गोगावले हे मंत्रिपदासाठीते प्रबळ दावेदार मानले जात असताना राष्ट्रवादीचा आणखी एक नेता शर्यतीत आहे. तर भरत गोगावले यांचे मंत्रिपद पक्कं असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. तब्बल वर्षभराच्या प्रतीक्षेनंतर भरत गोगावले यांना मंत्रिपद मिळणार असल्याच्या चर्चा आहेत. या सर्व गदारोळात भरत गोगावले यांनी एक वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. (Latest Marathi News)

 Bharat Gogawale
Neelam Gorhe : रश्मी ठाकरे राजकारणात येऊ शकतात ! निलम गोऱ्हेंचा गौप्यस्फोट, दिल्या शुभेच्छा

गोगावले यांच्या या वक्तव्यामुळे मंत्रिमंडळ विस्तारापूर्वी नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आता वर्तवण्यात येत आहे. भरत गोगावले यांनी अदिती तटकरे यांच्याविषयी बोलताना महिलांचा अवमान होईल, अशा स्वरुपाचं वक्तव्य केलं आहे. (Marathi Tajya Batmya)

भरत गोगावले आज (बुधवारी) मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. त्यावेळी त्यांनी रायगडच्या पालकमंत्री पदावरून प्रश्न करण्यात आला. रायगडचे पालकमंत्रीपद हे आता अदिती तटकरे यांना देखील मिळू शकते, यावर त्यांची प्रतिक्रिया विचारण्यात आली.(Latest Marathi News)

 Bharat Gogawale
Sanjay Raut : एकीकडं राऊतांची पत्रकार परिषद सुरु अन् सापाची झाली एन्ट्री! पाहा व्हिडिओ

तेव्हा भरत गोगावले म्हणाले, 'मग पालकमंत्री म्हणून आम्ही काय वाईट काम करणार आहोत का? आम्ही त्यांच्यापेक्षा चांगलं काम करु. महिला आणि पुरुष थोडा तर फरक येतोच ना. तर मला आमदारकीचा १५ वर्षांचा अनुभव आहे. सगळ्यांना बरोबर घेऊन आणि सहाच्या सहा आमदारांची एकच मागणी आहे, रायगडचा पालकमंत्री, भरतशेठ', असं भरत गोगावले बोलताना म्हणाले आहेत.(Latest Marathi News)

मंत्रीमंडळामध्ये पद सोबतच रायगडचे पालकमंत्रीपद मिळणार असल्याचं भरत गोगावले आधिपासुनच ठामपणे सांगत होते. अशातच अजित पवार यांच्यासोबत ८ मंत्र्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार अदिती तटकरे देखील आहेत. या रायगडच्या पालकमंत्रीपदाच्या शर्यतीत आल्या आहे. (Marathi Tajya Batmya)

 Bharat Gogawale
Eknath Shinde: 'CMOतून तुरुंगातील गुन्हेगारांशी डीलिंग, निवडणुकीआधी काढणार बाहेर'; ठाकरे गटाच्या नेत्याचा गंभीर आरोप

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.