राज्यातील सत्ता संघर्षाचा निकाल सर्वोच्च न्यायालयाने राखून ठेवला आहे, यादरम्यान उद्धव ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी दहा ते पंधरा दिवसात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं पद जाणार असं खळबळजनक वक्तव्य केलं आहे. यावर शिवसेनेचे प्रतोद भरत गोगावले यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
गेले सहा-सात महिने असं वक्तव्य करत आहेत. त्यांची भविष्यवाणी खरी ठरणार नाही. त्यांचा पोपट काही बरोबर पत्र काढत नाहीये. ते जे बोलत आहेत त्याच्या उलटचं होत आहेय आम्ही आणखी मजबूत होत आहोत असे भरत गोगावले म्हणाले. सरकार पडेल असं म्हणत असताना आमचे दहा महिने पूर्ण होत आले आहेत असेही गोगावले यांनी सांगितले.
मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना कामाने उत्तर देणार असं सांगितलंय, जर-तरची गोष्ट बघून घेऊ. संजय राऊत यांच्यासारखे बोलणारे फार आहेत आम्ही फार लक्ष देत नाहीत असेही त्यांनी सांगितलं.
सुप्रीम कोर्टाच्या निकालाची कसलीही धाकधूक नाहीये कारण सुप्रीम कोर्टामध्ये आम्ही मेरिटमध्ये आहोत. उद्धव ठाकरेंनी स्वतःहून राजीनामा दिला, अविश्वास ठराव दाखल केला नाही. त्यांनी स्वतःहून राजीनामा दिल्याने आमदारांच्या अपात्रतेचा प्रश्नच उद्भवत नाही, निकाल आमच्या बाजूने लागणार आहे असेही गोगावले यावेळी म्हणाले.
गोगावले पुढे बोलताना म्हणाले की, आगामी लोकसभेच्या निवडणूकीबाबत उद्धव ठाकरेंना सहानुभूती असल्याबद्दल बोलताना गोगावले म्हणाले की, कुठलीही गोष्ट पेरल्याबरोबर दिसत नाही. त्याला थोडा कालावधी लागतो. आम्ही आमची रणनिती आखत आहोत. उद्धव ठाकरेंकडं सहानुभूती होती, पण आता ती हळूहळू ओसरत चालली आहे असेही गोगावले यावेळी म्हणाले.
राऊत काय म्हणाले होते?
संजय राऊत म्हणाले की, मला माहित आहे की, दिल्लीमध्ये मुख्यमंत्री बदलाच्या हालचाली सुरू आहेत. हे मुख्यमंत्री राज्याचं नेतृत्व करण्यामध्ये आणि भाजपला जे पाहिजे ते साध्य करण्यात ते अपयशी ठरले आहेत. भाजपला आमचं सरकार पाडायचं होतं त्यासाठी त्यांचा वापर करण्यात आला ते काम पुर्ण झालं.
पण राजकीय दृष्ट्या महाराष्ट्रामध्ये भाजपला ताकत देण्यात हे मुख्यमंत्री अपयशी झाले आहेत आणि हे सरकार आल्यापासून शिंदे गटा सोबत भाजप देखील बदनाम होतोय. अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.