भाजप आमदार गावगुंडाप्रमाणे वागले; जाधवांचा हल्लाबोल

'लोकशाहीच्या मंदिरात बसतो, कसे वागतो? याचे आत्मपरीक्षण भाजप नेत्यांनी करावे'
भाजप आमदार गावगुंडाप्रमाणे वागले; जाधवांचा हल्लाबोल
Updated on

चिपळूण : विरोधी सदस्य सभापतींच्या दालनात घुसले. त्यांनी मला आई-बहिणीवरून शिव्या दिल्या. गावगुंडाप्रमाणे हे सदस्य वागत होते. संपूर्ण महाराष्ट्रासाठी (maharashtra) ही लाजिरवाणी गोष्ट आहे. माझ्यासाठी हा काळा दिवस आहे, अशा शब्दात तालिका सभापती भास्कर जाधव (bhaskar jadahv) यांनी विधिमंडळात घडलेल्या प्रकारानंतर आपली प्रतिक्रिया दिली.

मुंबईत पावसाळी (mumbai assembly) अधिवेशनाचे कामकाज सुरू आहे. यादरम्यान तालिका अध्यक्ष भास्कर जाधव यांनी ओबीसी आरक्षणाच्या (OBC reservation) ठरावावरील चर्चेदरम्यान झालेल्या घटनेची माहिती ''सकाळ''ला दिली. ते म्हणाले, अधिवेशनात ओबीसी आरक्षणाच्या ठरावावर चर्चा सुरू असताना भारतीय जनता पक्षाच्या आमदारांनी (BJP) सभागृहात गदारोळ केला. मी ३६ वर्ष सभागृहात काम करतोय. ज्या वेळी सर्व सदस्यांचा ध्येय आणि उद्दिष्ट एक असते, त्या वेळेला सर्वसाधारणपणे चर्चा न करता अनेक प्रस्ताव आपण एकमताने मंजूर करतो. काही वेळेला प्रस्तावात अधिकची सुधारणा व्हावी, करायची असेल तर दोन्ही बाजूचे म्हणणे ऐकून एकमताने प्रस्ताव मंजूर करून तो पुढे पाठवला जातो, अशी कामकाजाची पद्धत आहे.

भाजप आमदार गावगुंडाप्रमाणे वागले; जाधवांचा हल्लाबोल
Konkan Breaking - मंडणगड तालुक्यातील पणदेरी धरणाला मोठी गळती

या झालेल्या गोंधळादरम्यान काही आमदारांनी माईक ओढण्याचा प्रयत्न केला. सभागृहात ताणतणाव होत असतात, त्या वेळी सत्ताधारी आणि विरोधक बसून तोडगा काढत असतात. सत्ताधारी विरोधकांवर धावून जातात. पण एकदा अध्यक्षांनी कामकाज तहकूब केले तर विषय तिथेच संपतो. मी सभागृहात कधीही कटुता ठेवत नाही. ही आपल्या महाराष्ट्राची परंपरा आहे. आपण लोकशाहीच्या मंदिरात बसतो. आपण साधनसुचितेच्या गोष्टी करतो. सभ्यतेचा आव आणतो, पण आपण कसे वागतो? याचे आत्मपरिक्षण भाजप नेत्यांनी करण्याची गरज आहे, असे भास्कर जाधव यांनी सांगितले.

..तर माझापण राग कमी नाही

विधानसभा अध्यक्षांच्या दालनात मला विधानसभा अध्यक्षांची खुर्ची बसायला दिली गेली. मी बसलो नाही. कारण मी अध्यक्ष-उपाध्यक्ष नाही, म्हणून मी बसलो नाही. त्यानंतर फडणवीस आले. मी त्यांना बसायला खुर्ची दिली. चंद्रकांत पाटलांना खुर्ची दिली, भाजपचे काही सदस्य दालनात आले. गावगुंड, राडेबाजसारखे ते माझ्या अंगावर तुटून पडले. मी भाजपच्या वरिष्ठांना सांगत होतो, त्यांना आवरा. पण भाजपच्या वरिष्ठांनी माझ्यावर त्यांचा राग असल्याचे सांगत भाजप आमदारांना आवरले नाही. तुम्ही पन्नास-साठजण आलात. मी एक पाऊल मागे जाणार नाही. भास्कर जाधव अशा प्रसंगाला पाठ दाखवणारा नाही. तुमचा राग असेल तर माझापण राग कमी नाही, असे भाजप नेत्यांना ठणकावून सांगितल्याचे भास्कर जाधव यांनी सांगितले.

भाजप आमदार गावगुंडाप्रमाणे वागले; जाधवांचा हल्लाबोल
लाच घेताना तलाठी जाळ्यात; लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई

जाधवांचा हल्लाबोल...

मी सभागृहात कधीही कटुता ठेवत नाही आपण लोकशाहीच्या मंदिरात बसतो, कसे वागतो? याचे आत्मपरीक्षण भाजप नेत्यांनी करावे महाराष्ट्राच्या इतिहासात असे कधी घडले नाही

बाहेर ओबीसी समाजाबद्दलचे प्रेम...

प्रश्न ओबीसी समाजाचा होता. छगन भुजबळसारख्या ज्येष्ठ आणि अनुभवी नेत्याने ओबीसी समाजाचा विषय सभागृहागात विस्तृतपणे मांडला तर भाजपला त्याचा राग का आला? बाहेर ओबीसी समाजाबद्दलचे प्रेम असल्याचे दाखवायचे आणि जिथे खऱ्या अर्थाने ओबीसी समाजाला मदत करायची तिथे, असे असले धंदे करायचे. महाराष्ट्राच्या इतिहासात असे कधी घडले नाही, असेही त्यांनी बोलून दाखवले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.