गडकरींनी CM ठाकरेंना लिहिलेलं पत्र बाहेर कसं आलं?; सेनेचा सवाल

नितीन गडकरी
नितीन गडकरी
Updated on

शिवसैनिक कामात अडथळे निर्माण करत असल्याची तक्रार केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून केली होती. गडकरींच्या लेटरबॉम्बनंतर (union minister nitin gadkari to cm thackeray) पुन्हा एकदा शिवसेना-भाजप यांच्यातील वाद चव्हाट्यावर आला. गडकरींच्या पत्रावर आता शिवसेना नेते भास्कर जाधव यांनी प्रतिक्रिया दिली असून नितेश राणे यांच्या एका कृत्याची यावेळी त्यांनी आठवण करुन दिली आहे. तसेच गडकरी मुख्यमंत्र्यांना फोन करुन बोलू शकले असते, त्यांचं पत्र माध्यमांकडे कसं आलं? असा सवालही यावेळी भास्कर जाधव यांनी उपस्थित केला आहे.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून शिवसैनिकांची तक्रार केल्यानंतर आमदार भास्कर जाधव यांनी भाजपवर निशाना साधला आहे. नितीन गडकरी यांचं पत्र माध्यमांसमोर का आलं? असा सवालही भास्कर जाधव यांनी उपस्थित केला. सिंधुदुर्गामध्ये भाजपचे आमदार नितेश राणे यांनी आधिकाऱ्यांवर चिखल ओतला होता? याची आठवणही भास्कर जाधव यांनी करुन दिली.

नितीन गडकरी
राज्याचा धोका वाढला; डेल्टा प्लसचे तीन वेगवेगळे विषाणू आढळले

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यामध्ये एकमेकांबद्दल आदराची भावना आहे. गडकरींना असं पत्र लिहण्याचा अधिकार आहे. पण हीच गोष्ट ते फोनवरही बोलू शकले असते. पण मग हे गोष्ट माध्यमांसमोर का आलं? तुम्हाला खरंच अडथळा येत आहे, म्हणून मार्ग काढायचा आहे? की संधी मिळेल तिथे शिवसेनेला ठोकायचं आहे?, असा सवाल भास्कर जाधव यांनी उपस्थित केला. गडकरींनी पत्र लिहण्याऐवजी किंवा ते प्रसारमाध्यमांत प्रसारित करण्यापेक्षा मुख्यमंत्र्यासोबत बोलणं केलं असते तर आदराची भावना आणखी वाढली असती, असे भास्कर जाधव म्हणाले.

ज्यांनी सिंधुदुर्गामध्ये अधिकाऱ्यांच्या अंगावर चिखल ओतला ते आमदार तुमच्याच पक्षाचे आहेत. याची मला फक्त तुम्हाला आठवण करुन द्यायची आहे, असा चिमटा भास्कर जाधव यांनी यावेळी काढला.

नितीन गडकरी
आजपासून महाराष्ट्र अनलॉक, पाहा काय सुरु काय बंद?
नितीन गडकरी
पुण्यासह सात जिल्ह्यांनी महाराष्ट्राची चिंता वाढवली

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.