Bhaubeej 2023 : राजकीय मतभेद विसरुन सुप्रिया सुळेंनी केलं अजित पवारांना औक्षण

Bhaubeej 2023 : राजकीय मतभेद विसरुन सुप्रिया सुळेंनी केलं अजित पवारांना औक्षण
Updated on

पुणेः मागच्या पाच दिवसांमध्ये अजित पवार आणि शरद पवार यांची तीनवेळा भेट झाली आहे. एवढंच नाही तर राजकीय मतभेद विसरुन सुप्रिया सुळे यांनी अजित पवारांचं भाऊबीजेनिमित्त औक्षण केलं. काटेवाडीमध्ये हा सोहळा संपन्न झाला.

पवार कुटुंबिय मागच्या कित्येक वर्षांपासून एकत्रित दिवाळी साजरी करतं. यावेळी राजकीय परिस्थिती बदलल्यामुळे कुटुंब एकत्र येणार का? असा प्रश्न उपस्थित होत होता. परंतु दिवाळीच्या पर्वात तीनवेळा शरद पवार आणि अजित पवार यांच्यात भेटी झाल्या.

सुरुवातीला दिवाळीच्या पूर्वसंध्येला अजित पवार-शरद पवार यांची कौटुंबिक भेट झाली होती. त्यानंतर मोदीबागेत दिवाळी पाडव्याच्या कार्यक्रमाला दोन्ही नेते समोरासमोर आले. तर बुधवारी भाऊबीजेनिमित्त पुन्हा दोन्ही नेत्यांची भेट झाली. पवारांच्या काटेवाडीत भाऊबीजेच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं होतं.

Bhaubeej 2023 : राजकीय मतभेद विसरुन सुप्रिया सुळेंनी केलं अजित पवारांना औक्षण
Chandrakant Patil: अजित पवारांविरुद्ध भाजपमध्ये नाराजी? चलाख व धूर्त म्हणत चंद्रकांत पाटलांची तुफान फटकेबाजी

राजकीय मतभेद बाजूला ठेवत बुधवारी पवार कुटुंबियांनी काटेवाडीमध्ये भाऊबीज सणानिमित्त एकत्र येत सर्वांना शुभेच्छा दिल्या. उपमुख्यमंत्री अजित पवार यांना खासदार सुप्रिया सुळे आणि सर्व बहिणींनी औक्षण केलं. अजित पवारांपाठोपाठ श्रीनिवास पवार, उद्योजक रणजीत पवार, जयंत पवार यांनाही सर्व बहिणींनी मिळून औक्षण केलं.

Bhaubeej 2023 : राजकीय मतभेद विसरुन सुप्रिया सुळेंनी केलं अजित पवारांना औक्षण
Online Attendance : राज्यातील विद्यार्थ्यांची हजेरी आता चक्क ऑनलाईन! शाळा वापरणार अटेंडन्स बॉट; कधीपासून होणार लागू?

पवार कुटुंबाच्या या दिवाळसणामुळे सर्वांच्या भूवया उंचावल्या आहेत. काहीच महिन्यांपूर्वी अजित पवारांनी पक्षातून बंड करुन भाजपला साथ दिली होती. राष्ट्रवादीत बहुतांश आमदार अजित पवारांसोबत आहेत. काहीजण तर सरकारमध्ये मंत्रीदेखील आहेत. तरीही पवार एकत्र आल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.

दरम्यान, डेंगीने आजारी असल्याने आपण दिवाळीत कोणालाच भेटणार नाही असे अजित पवार यांनी अगोदरच जाहीर केल्याने ते दिवाळीत उपलब्ध नसणार हे स्पष्ट झाले होते. असे असले तरी प्रथेनुसार पवार कुटुंबियांच्या स्नेहमेळाव्यात मात्र अजित पवार व शरद पवार हेही सहभागी झाले.

गोविंदबागेतील स्नेहभोजनास अजित पवार तर भाऊबीजेनिमित्त काटेवाडी अजित पवार यांच्या घरी झालेल्या भोजनास ज्येष्ठ नेते शरद पवार व खासदार सुप्रिया सुळे यांच्यासह पवार कुटुंबिय उपस्थित होते.

पाडव्यानिमित्त गोविंदबागेत अजित पवार उपस्थित नसले तरी कौटुंबिक सर्वच कार्यक्रमांना त्यांनी उपस्थिती लावली व ज्येष्ठ नेते शरद पवार हेही सर्वच कार्यक्रमांना हजर राहिले. धनत्रोदयशीच्या दिवशी शरद पवार यांना अस्वस्थ वाटत असल्याने शारदोत्सवाला ते उपस्थित नव्हते, त्या दिवशी अजित पवार बेला शेंडे यांच्या कार्यक्रमास पूर्ण वेळ उपस्थित होते. सुप्रिया सुळे व अजित पवार यांनी एकत्र कलाकारांचा व्यासपीठावर सत्कारही केला.

गेल्या अनेक वर्षांपासूनची पवार कुटुंबियांची दिवाळीची नेहमीची प्रथा यंदाही कायमच राहिली. सुप्रिया सुळे यांनी वारंवार राजकीय मतभेद वेगळे व कौटुंबिक जिव्हाळा नाती वेगळी हे नमूद केले होते, त्याचाच प्रत्यय दिवाळीच्या निमित्ताने राज्यापुढे आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.