Bhavana Gawali: उद्धव यांच्या 'बाई' टीकेवर भावना गवळी संतापल्या; म्हणाल्या, ठाकरे...

Bhavana Gawali and Uddhav Thackeray
Bhavana Gawali and Uddhav Thackeray
Updated on

मुंबई - शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुंबईत बुधवारी घेतलेल्या सभेतील भाषणावर सत्ताधारी भाजप आणि एकनाथ शिंदे गटाकडून सातत्याने टीका करण्यात येत आहे. उद्धव ठाकरे यांनी बंडखोर खासदार भावना गवळी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर कडाडून टीका केली होती. त्या टीकेला आज भावना गवळी यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

Bhavana Gawali and Uddhav Thackeray
Uddhav Thackeray: तुम्हाला राखी बांधायला हीच बाई मिळाली? उद्धव यांचा मोदींना सवाल

खासदार भावना गवळी यांच्यावर टीका करताना उद्धव ठाकरे म्हणाले होते की, ज्यांच्यावर तुम्ही भ्रष्टाराचाराचे आरोप करत आहात त्यांना तुम्ही क्लिन चीट देत आहात. मला पंतप्रधानाचे आश्चर्य वाटते, ज्या बाईवर आरोप केले तीच बाई मिळाली का तुम्हाला राखी बांधायला, असा सवालही उद्धव यांनी उपस्थित केला होता. Bhavana Gawali news in Marathi

यावर भावना गवळी यांनी पत्रकार परिषद घेऊन म्हटलं की, मी मतदार संघातील एक लाख बांधवांना राखी बांधते. हा उपक्रम खूप जुना आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे गुजरातचे मुख्यमंत्री होते तेव्हापासून मी त्यांना राखी बांधते. मी मोदीजींना अहमदाबाद येथे जावून भेटलेले आहे. मात्र उद्धव ठाकरे यांनी केलेल्या विधानामुळे मी दुखावले गेले, असं भावना गवळी यांनी म्हटलं.

Bhavana Gawali and Uddhav Thackeray
आमच्या बंडाची ३३ देशांनी दखल घेतली; CM शिंदेंनी ठाकरेंना दिलेलं प्रत्युत्तर चर्चेत

दरम्यान राजकारण करण्यासाठी इतर मुद्दे आहे. मात्र एका पवित्र बंधानाबद्दल उद्धव साहेबांनी हे विधान केलं आहे. मला सगळ्या कठीण परिस्थितीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सहकार्य केलं. ज्यांच्यासाठी मी कालपर्यंत ताई होते आज त्यांच्यासाठी बाई झाले, ही गोष्ट माझ्या मनाला लागली, अशी खंत भावना गवळी यांनी व्यक्त केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.