भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणातील आरोपी डॉ. पी. वरवरा राव यांना जामीन मंजूर

सुप्रीम कोर्टाकडून वरवरा राव यांना नियमित जामीन मिळाला आहे.
Dr P Varavara Rao
Dr P Varavara Raoesakal
Updated on
Summary

सुप्रीम कोर्टाकडून वरवरा राव यांना नियमित जामीन मिळाला आहे.

Bhima Koregaon Violence Case : सुप्रीम कोर्टाकडून (Supreme Court) वरवरा राव (Dr. P Varavara Rao) यांना नियमित जामीन मिळाला आहे. त्यांचं वय आणि आजारपण लक्षात घेता त्यांना जामीन मिळालाय. भीमा-कोरोगाव हिंसाचार प्रकरणात आरोपी असलेले 82 वर्षीय वरवरा राव यांना सर्वोच्च न्यायालयानं जामीन वाढवला होता. त्यावर आता सुनावणी होऊन कोर्टाकडून राव यांना जामीन मिळाला.

सर्वोच्च न्यायालयानं 2018 च्या भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणातील आरोपी कार्यकर्ते आणि कवी डॉ. पी. वरावरा राव यांना वैद्यकीय कारणास्तव नियमित जामीन मंजूर केला आहे. या प्रकरणी सामाजिक कार्यकर्त्या सुधा भारद्वाज, नागरी हक्कांसाठी काम करणारे गौतम नवलखा, सामाजिक कार्यकर्ते अरुण परेरा, लेखक आणि सामाजिक कार्यकर्ते व्हर्नोन गोन्सालव्हिस यांनाही अटक करण्यात आली होती. या सगळ्यांनी मिळून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हत्येचा कट रचला, असा त्यांच्यावर आरोप आहे. वरवरा यांनी त्यांना आर्थिक मदत पुरवली, असा त्यांच्यावर आरोप आहे.

दरम्यान, देशविरोधी कारवाया करण्यासाठी लागणारे शस्त्रासे व दारूगोळा खरेदी करण्यासाठी मदत करणारा बसंता हा नेपाळमधील माओवादी संघटनेचा वरिष्ठ नेता आहे. तो राव यांच्या संपर्कात होता. आरोपी हे सीपीआयचा महासचिव मुपल्ला लक्ष्मण राव ऊर्फ गणपती ऊर्फ जी. एस. ऊर्फ कॉ. जी. याच्या संपर्कात राहून संघटनेची उद्घिष्ट पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करीत. तर, राव हे सीपीआयसाठी निधी उभारणे, तो पुरविणे व त्याचे वितरण करण्याचे काम करीत आहे, असे दोषारोपपत्रात नमूद करण्यात आलं होतं, त्यामुळं राव यांच्यावर कारवाई सुरु होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.