Bhimashankar Row : "सौ चुहे खा के..."; ज्योतिर्लिंगाच्या वादावर भाजपाचा मविआलाच दोष

भाजपाच्या आध्यात्मिक आघाडीचे आचार्य तुषार भोसले यांनी आसाम सरकारचा निषेधही केला आहे..
Bhimashankar Temple
Bhimashankar TempleSakal
Updated on

बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या भीमाशंकर ज्योतिर्लिंगाच्या जागेवरुन आता वाद पेटण्याची शक्यता आहे. आसाम सरकारने भीमाशंकर हे ज्योतिर्लिंग आपल्या राज्यात असल्याचा दावा केला आहे. त्यावरुन अनेक नेत्यांकडून संतप्त प्रतिक्रिया येत आहेत.

भाजपाच्या आध्यात्मिक आघाडीचे आचार्य तुषार भोसले यांनीही यावर प्रतिक्रिया दिली आहे. भोसले म्हणाले, "वृत्तपत्रातील जाहिरातीतून वास्तव आणि सत्य बदलत नाही. भीमाशंकर हे ६ वे ज्योतिर्लिंग महाराष्ट्रातच आहे आणि केंद्र सरकारकडे पण हीच नोंद. आसाम सरकारच्या या प्रकाराचा आम्ही निषेधच करु आणि हे प्रकार खपवून घेतलेच जाणार नाहीत पण ज्या मविआच्या लोकांनी दोन वर्ष आमच्या देवांना कोंडून ठेवलं आणि मंदिरांवर सगळ्यात जास्त अन्याय केला त्यांनी आज मंदिरांवर बोलणं म्हणजे ‘सौ चुहे खा के बिल्ली चली हज’ असे आहे".

Bhimashankar Temple
Congress Vs BJP: "केवळ उद्योगच नव्हे तर भाजपाला महाराष्ट्रातून भगवान शंकरांनाही हिसकावून न्यायचंय"

दरम्यान, राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीही यावरुन राज्य सरकारवर टीका केली आहे. आसामला गेला होता, त्यावेळी त्यांनी तुमची जी सोय केली, त्याच्या बदल्यात ज्योतिर्लिंग देऊन आलात की काय, असा सवाल त्यांनी मुख्यमंत्री शिंदे यांना विचारला आहे.

Bhimashankar Temple
Supriya Sule : "सत्तांतरासाठी केलेल्या मदतीच्या बदल्यात भीमाशंकर आसामला देऊन आलात?"

आपल्या ट्वीटमध्ये सुप्रिया सुळे म्हणतात, "भाजपाची सत्ता असणाऱ्या आसाम राज्याने गुवाहाटीजवळ असणारं पामोही इथलं शिवलिंग हे सहावं ज्योतिर्लिंग असल्याचा प्रचार सुरू केला आहे. हा अतिशय खोडसाळ आणि तथ्यहीन प्रसार आहे. घटनाबाह्य ED सरकार, आपण गुवाहाटीला आमदारांची फौज पळवून नेली होती. तिथं तुमची सर्व सोय अदृश्य शक्तीच्या वतीने आसामच्या मुख्यमंत्र्यांनी केली होती. त्याचवेळी तुम्ही बदल्यात हे भीमाशंकर ज्योतिर्लिंग तर देऊन आला नाहीत ना? अर्थात अशी शक्यता नाकारता येत नाही."

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.