Bhiwandi Building Collapse: भिवंडी इमारत दुर्घटनेत आतापर्यंत 8 जणांचा मृत्यू, तर 10 जणांना जिवंत काढलं बाहेर

ढिगाऱ्याखालून 17 जणांना बाहेर काढण्यात यश आलं आहे
Bhiwandi Building Collapse
Bhiwandi Building CollapseEsakal
Updated on

भिवंडीतील वळपाडा परिसरात शनिवारी तीन मजली इमारत कोसळून मोठी दुर्घटना घडली आहे. आतापर्यंत या घटनेत 8 जणांचा मृत्यू झाला आहे. तर ढिगाऱ्याखील अडकलेल्या 10 जणांना वाचवण्यात NDRF च्या पथकाला यश आलं आहे. आतापर्यंत 18 जणांना बाहेर काढलं आहे.

दरम्यान, मृतांच्या नातेवाईकांना राज्य सरकारकडून 5 लाखांची मदत जाहीर करण्यात आली आहे. तसेच मुख्यमंत्री शिंदेंनी रुग्णालयात जाऊन जखमींची विचारपूस केली आहे. इमारत दुर्घटनेप्रकरणी इमारत मालक इंद्रपाल पाटीलला पोलिसांनी ताब्यात घेतलं असून या संपूर्ण प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Bhiwandi Building Collapse
दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर...

नारपोली पोलिसांनी इमारत बांधणाऱ्या मालकावर गुन्हा दाखल करून त्याला ताब्यात घेण्यात आलं आहे. त्याच्याविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम 304 (2), 337, 338 आणि 427 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. इंद्रपाल पाटील असं ताब्यात घेतलेल्या इमारतीच्या मालकाचं नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पाटील यांनी 2014 मध्ये ही इमारत बांधली असून बहुतांश खोल्या दुकानदार आणि रहिवाशांना भाड्याने देण्यात आल्या होत्या.

Bhiwandi Building Collapse
Uddhav Thackrey: उद्धव ठाकरेंना मोठा धक्का! संघटनेची इत्यंभूत माहिती असलेला नेता शिंदेंच्या गळाला

पोलिस, अग्निशमन दल, एनडीआरएफ तसेच इतर बचाव पथकांनी हे बचाव कार्य व्यवस्थित पार पाडावं तसेच जखमींना तत्काळ रुग्णालयांमध्ये हलवून उपचार सुरू करावेत, असे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी प्रशासनाला दिले आहेत. ठाणे आपत्ती व्यवस्थापनाच्या टीमकडूनही घटनास्थळी बचावकार्य सुरु आहे. सध्या NDRF कडून शेवटची चाचपणी सुरू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.