पुणे: पुण्यातील भोसरी जमीन घोटाळा (Pune Bhosari Land Case) प्रकरणी एनसीपी नेते एकनाथ खडसेंचे (Eknath Khadse) जावई गिरीश चौधरी (Girish Chaudhari) यांचा जामीन न्यायालयाने (Court) आज फेटाळला. पुणे एमआयडीसी (Pune MIDC) जमीन गैरव्यवहार प्रकरणात अटकेत असलेल्या चौधरी यांच्या जामीन अर्जावर मा. न्या आर. एन. रोकडे यांच्या न्यायालयात सुनावणी होती. मुंबईतील विशेष पीएमएलए कोर्टाने फेटाळलाजामीन अर्ज फेटाळला.
एमआयडीसी भोसरी जमीन गौरव्यवहार प्रकरणात गिरीश चौधरी यांना अटक करण्यात आले होते.
एमआयडीसी भोसरी जमीन गौरव्यवहार प्रकरणात गिरीश चौधरी यांना ६ जुलै २०२१ रोजी ईडी तर्फे अटक करणायत आली होती. दरम्यान काल एकनाथ खडसेंच्या पत्नी मंदाकिनी खडसेंना (Mandakini Khadse) हायकोर्टाचा दिलासा दिला होता. त्यांची पुढील सुनावणी १४ मार्च रोजी होणार आहे. मात्र त्यांच्या जावयाचा जामीन न्यायालयाने आज फेटाळला.
काय आहे प्रकरण?
एकनाथ खडसे यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे आणि जावाई गिरीश चौधरी यांनी 28 एप्रिल 2016 रोजी भोसरी येथील एमआयडीसी येथील सव्र्हे क्र. 52/2 अ ही जमीन अब्बास रसुलभाई उकानी नामक मूळ जमीन मालकाकडून 3.75 कोटी रुपयांना खरेदी केली. नोंदणी निबंधकांच्या कार्यालयात या व्यवहाराची रीतसर नोंद केली. अशा प्रकारे एमआयडीसीच्या ताब्यात असलेल्या आणि त्यांच्या मालकीच्या जमिनीचे खडसे कुटुंबीय सरकारी कागदोपत्री मालक झालेले आहेत. या व्यवहाराखाली गिरीश यांनी पाच शेल कंपन्यांकडनं आलेला पैसा वापरल्याचं कागदोपत्री निष्पन्न झालेलं आहे. या सर्व व्यवहारात राज्य सरकारचं सुमारे 61 कोटी रुपयांच्या महसुलाचं नुकसान झाल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत आहे. म्हणून गिरीश चौधरी यांना सक्तवसुली संचलनालयाने (ईडी) चौकशीसाठी बोलावून त्यांना अटक केली होती. एकनाथ खडसे यांचीही याप्रकरणी चौकशी करण्यात आली होती.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.