Bhosari Land Scam: भोसरी भूखंड घोटाळा प्रकरणी खडसे कुटुंबियांना मोठा दिलासा! कोर्टानं दिला महत्वाचा निर्णय

गेल्यावर्षी त्यांना अंतरिम जामीन कोर्टानं मंजूर केला होता.
mandakini khadse
mandakini khadseesakal
Updated on

मुंबई : पिंपरी-चिंचवडमधील कथित भोसरी एमआयडीसीतील भूखंड घोटाळाप्रकरणी खडसे कुटुंबियांना मोठा दिलासा मिळाला आहे. एकनाथ खडसे यांच्यासह पत्नी आणि जावयाला कोर्टानं नियमित जामीन मंजूर केला आहे. (Bhosari Land Scam big relief for eknath khadse in case regular bail granted)

mandakini khadse
Arvind Kejriwal Arrest: राहुल गांधी केजरीवालांना कायदेशीर मदत करणार; कुटुंबियांशी साधला संवाद

एकनाथ खडसे, मंदाकिनी खडसे आणि गिरीश चौधरी या तिघांना नोव्हेंबर २०२३ मध्ये हायकोर्टानं अंतरिम जामीन मंजूर केला होता. त्यानंतर आता त्यांना नियमित स्वरुपाचा अटकपूर्व जामीन मंजूर करण्यात आला आहे. त्यामुळं खडसे कुटुंबियांसाठी हा मोठा दिलासा मानला जात आहे. (Latest Marathi News)

mandakini khadse
Supriya Sule: आमदार रोहित पवार व युगेंद्र पवार यांना सुरक्षा पुरविण्याची सुप्रिया सुळे यांची मागणी; काय आहे कारण?

काय आहे प्रकरण?

खडसे हे महसूल मंत्री असताना त्यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे आणि जावई गिरीश चौधरी यांनी २०१६ मध्ये भोसरीतील एमआयडीसीमध्ये एक भूखंड खरेदी केला होता. बाजारभावापेक्षा अगदी कमी किमतीत हा भूखंड खरेदी केल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला होता. या प्रकरणी सामाजिक कार्यकर्ते हेमंत गावंडे यांनी बंडगार्डन पोलिस ठाण्यात खडसे यांच्यासह पत्नी आणि जावयावर गुन्हा दाखल केला होता. पोलिसांनी तपासानंतर ११ ऑक्टोबर २०२३ रोजी आरोपींवर दोषारोपपत्र दाखल केलं होतं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.