Bhandara Rape Case : मोठी कारवाई! एक पोलीस अधिकारी, दोन कर्मचारी निलंबित

भंडाऱ्यातील अमानुष घटनेच्या एसआयटीमार्फत चौकशीचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.
Bhandara Gang Rape Case
Bhandara Gang Rape CaseSakal Digital
Updated on

भंडारा सामुहिक बलात्कार प्रकरणी भंडारा पोलिसांनी मोठी कारवाई केली असून कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी एका पोलीस अधिकाऱ्यावर तर दोन कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. पोलिसांनी बारा तासांच्या आत मुख्य आरोपीला बेड्या घातल्याचा दावा पोलिसांकडून करण्यात आला आहे. पोलीस उपमहानिरिक्षक संदीप पाटील यांनी यासंदर्भातील अधिकृत माहिती दिली आहे. (Big action in Bhandara rape case a police officer two constables suspended)

Bhandara Gang Rape Case
आदित्य ठाकरेंची प्रकृती बिघडली; शिव संवाद यात्रेचा चौथा टप्पा रद्द

डीआयजी पाटील म्हणाले, ही घटना घडल्यानंतर भंडारा पोलिसांनी मुख्य आरोपींवर १२ तासांच्या आत कारवाई केली आहे. यामध्ये एक मुद्दा समोर आला आहे की, रात्री पीडित महिला लाखणी पोलीस स्टेशनमध्ये आली होती. त्यावेळी नेमकं काय झालं? याची चौकशी भंडारा जिल्हा पोलीस प्रमुखांनी केली आहे. आज त्या अहवालानुसार एक पोलीस अधिकारी आणि दोन कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. पण यामध्ये त्यांची काय चूक होती हे अहवाल समोर आल्यानंतर कळेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.