BRS Vs Congress: एकिकडे महाराष्ट्रात मोर्चेबांधणी सुरु असताना घरच्या अंगणात BRSला धक्का; १८ जणांचा रामराम

तेलंगणातील बीआरएसच्या दीड डझन नेत्यांचा पक्षाला रामराम
BRS K. Chandrashekar Rao News
BRS K. Chandrashekar Rao NewsESAKAL
Updated on

एकीकडे महाराष्ट्रात पक्षविस्तारासाठी कंबर कसून प्रयत्न सुरू केले असतानाच तेलंगणा मुख्यमंत्री केसीआर यांना राज्यातच मोठा धक्का बसला आहे. तेलंगणातील भारत राष्ट्र समिती पक्षाचे जवळपास १८ नेते आज काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. भारत राष्ट्र समितीचे माजी खासदार पी.एस. रेड्डी, माजी मंत्री कृष्णा राव आदी नेते आज दिल्लीत मल्लिकार्जुन खरगे आणि राहुल गांधी यांच्या उपस्थितीमध्ये काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत.(Latest Marathi News)

खम्ममचे पीएस रेड्ड, माजी मंत्री कृष्णा राव, आमदार दामोदर रेड्डी आणि तीन-चार माजी आमदारांसह १८ नेते दिल्लीत काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि राहुल गांधी सोमवारी दिल्लीतील पक्षाच्या मुख्यालयात या नेत्यांचे स्वागत करणार आहेत. कर्नाटकातील मोठ्या विजयानंतर काँग्रेसने तेलंगणातील सत्ताधारी बीआरएसला मोठं खिंडार पाडलं आहे.(Latest Marathi News)

तेलंगणाचे मुख्यमंत्री आणि बीआरएस पक्षाचे सर्वेसर्वा चंद्रशेखर राव हे महाराष्ट्रामध्ये पक्षाची मोर्चे बांधणी करत आहेत. मराठवाड्यातील नांदेड आणि त्याचप्रमाणे विदर्भातील नागपूर येथे जाहीर सभा घेतल्यानंतर आता बीआरएस पक्षाची वातावरण निर्मिती करण्यात आली आहे.(Latest Marathi News)

BRS K. Chandrashekar Rao News
Accident: बसच्या भीषण अपघातात १२ जण ठार ८ जखमी

तर पंढरपूर येथील आषाढी एकादशीच्या निमित्त बीआरएस पक्षाचे सर्व पदाधिकारी, नेते, लोकप्रतिनिधी आणि कार्यकर्ते हजर राहणार आहेत. महाराष्ट्र, कर्नाटक आणि आंध्र प्रदेशातून येणाऱ्या लाखो वारकऱ्यांच्यासमोर एकाच वेळेस बीआरएस पक्षाचं प्रमोशन होईल या उद्देशानेच हे सर्व केलं जात आहे.(Latest Marathi News)

तर, भारत राष्ट्र समितीच्या बंडखोर नेत्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याअगोदर चर्चा करण्यासाठी सोमवारी नवी दिल्लीत तेलंगणा काँग्रेसच्या नेत्यांची पक्षाच्या केंद्रीय नेत्यांसोबत महत्त्वाची बैठक होणार आहे. अविभाजित खम्मम आणि महबूबनगर जिल्ह्यातील प्रमुख नेत्यांना या बैठकीसाठी बोलवण्यात आले आहे. या बैठकीत बीआरएस आणि भाजपमधील आणखी नेते सहभागी होणार असल्याची माहीती आहे.(Latest Marathi News)

BRS K. Chandrashekar Rao News
Weather Update: देशभरात मान्सून सक्रिय! हिमाचल प्रदेशात ढगफुटी, उत्तराखंडमध्ये भूस्खलन; तर मुंबईसह दिल्लीत ठिकठिकाणी साचलं पाणी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.