NCP Politics: राष्ट्रवादीला धक्का! भुजबळांचा निष्ठावंत नेता, 11 माजी नगरसेवकांसह भाजपमध्ये प्रवेश करणार

ठाकरे गटानंतर आता राष्ट्रवादीला नाशिकमध्ये मोठं खिंडार पडण्याची शक्यता
Sharad Pawar-Chhagan Bhujbal
Sharad Pawar-Chhagan Bhujbal Esakal
Updated on

राज्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहेत. बरेच नेते सत्ताधारी पक्षामध्ये प्रवेश करताना दिसून येत आहेत अशातच आता ठाकरे गटानंतर आता राष्ट्रवादीला नाशिकमध्ये खिंडार पडण्याची शक्यता आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे नाशिकमध्ये येऊन गेल्यानंतर बऱ्याच घडामोडी घडताना दिसत आहेत.

राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांचे जवळचे सहकारी आणि माजी नगराध्यक्ष सुनील मोरे हे लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची जोरदार चर्चा रंगल्या आहे. मोरे यांनी चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेतली होती. त्यानंतर या चर्चांना उधाण आलं आहे. त्यामुळे छगन भुजबळ यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.

Sharad Pawar-Chhagan Bhujbal
Shivani Wadettiwar: "बलात्कार राजकीय हत्यार...", लेकीच्या सावरकरांवरील वक्तव्यानंतर वडेट्टीवारांची पहिली प्रतिक्रिया

माजी नगराध्यक्ष सुनील मोरे हे छगन भुजबळ यांचे निकटवर्तीय आहेत. नाशिकच्या सटाणा येथील शहर विकास आघाडीचे मोरे हे संस्थापक आहेत. त्याचबरोबर ते सटाण्याचे माजी नगराध्यक्ष देखील आहेत. या शिवाय छगन भुजबळ चालवत असलेल्या समता परिषदेचे ते माजी ग्रामीण जिल्हाप्रमुख आहेत.

Sharad Pawar-Chhagan Bhujbal
Old Mumbai Pune Highway Acident: बोरघाटाच्या अपघातातील जखमींची नावे जाहीर, झांज पथकातील वादकांचा होता समावेश

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या सटाणा दौऱ्यावेळी मोरे यांनी बावनकुळे यांची भेट घेतली होती. या भेटीनंतर ते भाजपमध्ये जाणार असल्याच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

सुनील मोरे यांच्या भाजप प्रवेशामुळे नाशिक ग्रामीणमध्ये मोठी ताकद मिळेल. शहर विकास आघाडीचे 11 माजी नगरसेवक आणि शेकडो समर्थक कार्यकर्त्यांसह ते भाजपमध्ये पक्षप्रवेश करणार आहेत. मोरे यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. त्यामुळे मोरेंचा भाजप प्रवेश जवळजवळ निश्चित झाल्याचे मानलं जात आहे. फक्त प्रवेशाची तारीख ठरायची बाकी असल्याचंही सांगितलं जात आहे. त्यामुळे छगन भुजबळ यांच्यासाठी हा मोठा धक्का बसणार आहे.

Sharad Pawar-Chhagan Bhujbal
Amit Shah: अमित शाह मुंबईच्या दौऱ्यावर! चंद्रकांत पाटील मात्र कोल्हापुरात; नाराजीच्या चर्चांना उधाण

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.