Maharashtra Politics: राष्ट्रवादीला मोठा धक्का! एकनाथ खडसेंसोबत गेलेल्या पाच जणांची भाजपमध्ये घरवापसी

एकनाथ खडसे यांच्यासोबत राष्ट्रवादीत प्रवेश केलेल्या पदाधिकाऱ्यांनी पुन्हा एकदा भाजपमध्ये प्रवेश केला
Maharashtra Politics
Maharashtra PoliticsEsakal
Updated on

राज्याच्या राजकारणात गेल्या काही दिवसांमध्ये पक्षांतराला वेग आला आहे. अशातच भाजपने राष्ट्रवादीला मोठा धक्का दिला आहे. राष्ट्रवादीचे नेते आणि आमदार एकनाथ खडसे यांच्यासोबत राष्ट्रवादीत प्रवेश गेलेल्या पदाधिकाऱ्यांनी पुन्हा एकदा भाजपमध्ये प्रवेश केला आहे.

भुसावळमध्ये राष्ट्रवादीला हा मोठा धक्का बसला आहे. राष्ट्रवादीचे नेते आमदार एकनाथ खडसे यांच्यासोबत भाजपमधून राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केलेल्या पाच माजी नगरसेवक, पदाधिकारी पुन्हा स्वगृही म्हणजेच भाजपमध्ये परतले आहेत. त्यामुळे राष्ट्रवादीसाठी मोठा धक्का मानला जात आहे.

Maharashtra Politics
Loksabha Election : RPI ला सोबत घेतल्याशिवाय महायुतीला राज्यात सत्ता आणणं अशक्य; रामदास आठवलेंचं मोठं विधान

आमदार संजय सावकारे यांच्या उपस्थितीमध्ये या नेत्यांचा पुन्हा भाजपमध्ये प्रवेश झाला आहे. हा खडसे गटासाठी मोठा धक्का मानला जात आहे.

भाजपच्या ९ नगरसेवकांनी माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्या नेतृत्वात आणि अजित पवारांच्या उपस्थितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसध्ये प्रवेश केला होता. मात्र आता यातील पाच जणांनी पुन्हा एकदा भाजपमध्ये प्रवेश केला आहे.

प्रभारी नगराध्यक्ष प्रमोद नेमाडे, माजी नगरसेवक बोधराज चौधरी, माजी नगरसेविका शैलजा नारखेडे यांचे पती पुरुषोत्तम नारखेडे, माजी नगरसेविका शोभा नेमाडे यांचे पुत्र दिनेश नेमाडे व अनिकेत पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. 9 माजी नगरसेवकांपैकी दोन नगरसेवकांनी आधीच भाजपमध्ये प्रवेश केला आहे. उर्वरीत दोघेही भाजपच्या वाटेवर असल्याचं बोललं जात आहे.

भाजपमध्ये प्रवेश केलेले हे पाचही माजी नगरसेवक हे एकनाथ खडसे यांचे निष्ठावंत म्हणून ओळखले जातात. त्यामुळे आगामी निवडणुकींच्या दृष्टीकोनातून खडसे गटाला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.

Maharashtra Politics
Ambabai Temple : 'पितळी उंबरा ओलांडून घ्या आता कोल्हापूरच्या अंबाबाईचं दर्शन'; कधी मिळणार मंदिरात प्रवेश? जाणून घ्या अपडेट

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.