शिवसेनेत दोन गट पडल्यापासून आणि शिंदे आणि भाजप सरकार स्थापन झाल्यापासून बाळासाहेबांची शिवसेना गटामध्ये जोरदार इन्कमिंग सुरू आहे. नाशिक, ठाणे, इंदापूर यानंतर आता परभणी जिल्ह्यात शिवसेनेच्या ठाकरे गटासह राष्ट्रवादीला शिंदे गटाने धक्का दिला आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे निकटवर्ती असलेले आमदार बाबाजानी दुर्राणी हे शिंदे गटाच्या वाटेवर असल्याची चर्चा रंगली आहे.
परभणीचे राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाबाजानी दुर्राणी यांनी पदाचा राजीनामा दिल्याचे वृत्त आहे. त्यामुळे परभणीमध्ये पक्षाला मोठा धक्का मानला जात आहे. राष्ट्रवादीचे नेते तथा माजी आमदार सुरेश लाड यांनीही रायगड जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा दिला. त्यांनी अचानकपणे त्यांनी पदत्याग केल्यामुळे हा राष्ट्रवादीसाठी मोठा धक्का मानला जात आहे. प्रकृतीच्या कारणास्तव मी राजीनामा देत असल्याचे लाड यांनी सांगितले आहे.
आता लाड यांच्यापाठोपाठ दुर्राणी यांनी दिलेला राजीनामा चर्चेत आहे. विशेषतः मारहाणीनंतर त्यांनी हा राजीनामा दिला आहे. त्या मागचे नेमके कारण काय, अशी चर्चा आता सुरू आहे. तर परभणी जिल्ह्यातील 40 सरपंचांनी शिंदे गटात प्रवेश केला. त्यानंतर हा शिंदे गटाचे नेते सईद खान यांनी आमदार बाबाजानी दुर्राणी हे शिंदे गटाच्या वाटेवर असल्याचा गौप्यस्फोट केला.
परभणीमध्ये त्यांच्या पक्षप्रवेशामुळे राष्ट्रवादीला मोठा धक्का बसणार आहे. तर काल पुणे जिल्ह्यातील बारामती, दौंड, इंदापूरसह सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यातील काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील कार्यकर्त्यांनी बाळासाहेबांची शिवसेना पक्षात प्रवेश केला. मंत्रालयासमोरील बाळासाहेब भवन येथे हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्वांचे पक्षात स्वागत करून शुभेच्छा दिल्या.
माजी आमदार नारायण आबा पाटील, इंदापूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष महारुद्र पाटील, इंदापूर पंचायत समितीचे माजी सभापती सुभाष जगताप, पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस वसंतराव अरडे, वरवंटे बुद्रुकचे माजी सरपंच नामदेव बनकर, देविदास भोंग, वैभव जामदार, दौंड मधील धनगर समाजाचे नेते राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सचिव पांडुरंग मेरगळ, विजय मदनेंसह आदींनी शिंदे गटात प्रवेश केला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.