Uddhav Thackrey: आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर CM शिंदेंचा ठाकरेंना धक्का! दोन शिलेदारांनी सोडली साथ

ठाकरे गटातून शिंदे गटात इनकमिंग सुरू
Uddhav Thackrey
Uddhav Thackrey Esakal
Updated on

शिवसेनेत बंड झाल्यापासून ते आजपर्यंत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत मोठ्या प्रमाणावर इनकमिंग सुरू असल्याचं दिसून येत आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीच्या काही नेत्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला. त्यानंतर आता मुंबईमध्ये ठाकरे गटाच्या दोन शिलेदारांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडली आहे. आगामी निवडणुकीच्या दृष्टीकोनातुन राज्यातील राजकीय पक्षात मोठ्या हालचाली सुरू असल्याचे दिसुन येत आहे.

काल (शुक्रवारी) ठाकरे गटाच्या दोन माजी नगरसेवकांनी आपल्या शेकडो समर्थकांसह शिवसेनेत (शिंदे गटात) प्रवेश केला आहे. कांदिवली बीएमसी प्रभाग क्रमांक 28 चे नगरसेवक एकनाथ हुंडारे आणि मढचे माजी नगरसेवक गणेश भंडारी यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. ठाकरे गटासाठी हा आणखी एक धक्का मानला जात आहे.

Uddhav Thackrey
मी सावरकरांचा भक्त आहे म्हणून… थुंकण्याला राऊतांनी जोडलं हिंदू संस्कृतीशी; अजित पवारांना देखील टोमणा!

एकनाथ हुंडारे आणि माजी नगरसेवक गणेश भंडारी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये शिंदे गटात प्रवेश केला आहे. त्यांच्यासोबत त्यांच्या शेकडो समर्थकांनी देखील शिंदे गटात प्रवेश केला. आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर हा पक्ष प्रवेश झाल्याचा फटका हा ठाकरे गटाला बसण्याची शक्यता आहे.

Uddhav Thackrey
Rahul Gandhi: विरोधी पक्ष एकवटलेत! निकालानंतर सगळ्यांनाच धक्का बसेल राहुल गांधींचे परदेशातून भाकीत

ठाकरे गटातून शिंदे गटात इनकमिंग सुरूच आहे, आता पुन्हा एकदा शिंदे गटाकडून ठाकरे गटाला मोठा दणका देण्यात आला आहे. तर ठाकरे गटच नाही तर राज्यातील इतरही पक्षातील नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत जाताना दिसत आहेत.

Uddhav Thackrey
Ajit Pawar On Raut : अजित पवारांचा ऑन कॅमेरा थुंकणाऱ्या राऊतांना मोलाचा सल्ला, म्हणाले…

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.