एकनाथ शिंदे आणि समर्थक आमदार, खासदार यांनी शिवसेनेत बंड केलं. तेव्हापासून शिवसेना ठाकरे गटात गळती सुरू झाली आहे. निवडणूक आयोगाने शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण पक्षचिन्ह हे शिंदे गटाला दिले. त्यानंतर ठाकरे गटातील अनेक बड्या नेत्यांनी, आमदार, खासदार आणि पदाधिकाऱ्यांनी शिंदे गटात प्रवेश केला. अशातच आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. लातूरमधील माजी जिल्हाप्रमुख आणि पालघरमधील चार नगरसेवकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थिती शिवसेनेत प्रवेश केला आहे.
पालघरमधील ठाकरे गटातील चार नगरसेवकांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे. नागपूरमध्ये सुरु असलेल्या हिवाळी अधिवेशनात नगरसेवक उत्तम घरत, सुभाष पाटील यांच्यासह इतर नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. पालघरमधील अजून आठ नगरसेवक शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची माहिती समोर आली आहे.
गेल्या वर्षभरात पालघर जिल्ह्यामध्ये ग्रामपंचायत निवडणुका किंवा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुका यामध्ये शिवसेना शिंदे गटाला मोठा पराभवाचा सामना करावा लागला होता. अशातच आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून शिवसेना शिंदे गटाने पक्ष बांधणीवर भर दिला आहे.
लातूरमध्ये ठाकरे गटाला खिंडार
तर लातूरमध्येही ठाकरे गटाला गळती लागली आहे. ठाकरे गटाचे माजी जिल्हाप्रमुख शिवाजी माने यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी नागपूर येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेना (शिंदे गटात) प्रवेश केला आहे.
शिवाजी माने हे गेल्या अनेक वर्षांपासून शिवसेनेचे निष्ठावंत कार्यकर्ते होते. काही दिवसांपूर्वी शिवाजी माने यांची जिल्हाप्रमुख पदावरून काढून जिल्हा संघटकपदी निवड करण्यात आली होती. यामुळे शिवाजी माने हे ठाकरे गटावर नाराज असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होती.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.