Maharashtra Politics: लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर ठाकरेंना धक्का! आणखी एका आमदाराने साथ सोडली; आज करणार शिंदे गटात प्रवेश

Maharashtra Loksaha Election 2024: ठाकरे गटाचे विधान परिषदेचे आमदार आमश्या पाडवी आज शिंदे गटात प्रवेश करणार आहेत. एकीकडे लोकसभेची तयारी सुरू असतानाच आणखी एका आमदाराने साथ सोडल्याने ठाकरेंना हा मोठा धक्का मानला जात आहे.
Maharashtra Politics
Maharashtra PoliticsEsakal
Updated on

राज्यासह देशात निवडणुकीची जोरदार तयारी सुरू असतानाच ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. शिवसेना ठाकरे गटाचे विधान परिषदेचे आमदार आमश्या पाडवी हे आज शिवसेना शिंदे गटामध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती समोर आली आहे. आमश्या पाडवी आपल्या कार्यकर्त्यांसह मुंबईला पक्षप्रवेशासाठी जात असल्याचा व्हिडिओ त्यांनी आपल्या सोशल मिडीया इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर केलेला आहे. त्यांच्या अधिकृत पेजवरसुद्धा हा व्हिडिओ शेअर करण्यात आल्यामुळे ते शिवसेना शिंदे गटामध्ये जाणार असल्याचं निश्चित झालं आहे.

कोण आहेत आमश्या पाडवी?

आमश्या पाडवी हा शिवसेनेचा नंदुरबार जिल्ह्यातील आदिवासी चेहरा आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून ते शिवसेनेत आहेत. नंदुरबार जिल्ह्यात शिवसेना पक्ष तळागाळात पोहचवण्यासाठी मोठे कष्ट घेतले. 2022 साली झालेल्या विधानपरिषद निवडणुकीत उद्धव ठाकरे यांनी आमश्या पाडवी यांना विधानपरिषदेची उमेदवारी दिली. त्यामुळे पक्षातील इतर नेते त्यांच्यावर नाराज झाले होते. एकनाथ शिंदेंनी बंड केल्यानंतर 40 आमदार त्यांच्यासोबत गेले. मात्र, पाडवी ठाकरेंच्या बाजूने उभे राहिले होते. मात्र, आज ते शिंदे गटात पक्षप्रवेश करणार आहेत.

Maharashtra Politics
NCP News: शरद पवारांचे फोटो वापरणार नाही; अजित पवार गटाकडून सुप्रीम कोर्टात प्रतिज्ञापत्र सादर

आमदार आमश्या पाडवी यांच्यासोबत नंदुरबार जिल्हा परिषदेचे शिक्षण सभापती गणेश पराडके तसेच जिल्ह्यातील ठाकरे गटातील अनेक मोठे चेहरे हे शिंदे गटात जाहीर प्रवेश करणार आहेत. येत्या लोकसभा निवडणुकीत शिंदे गटाच्या वतीने आमदार आमश्या पाडवी यांना उमेदवारी मिळणार का हे पाहणे महत्त्वाचं असणार आहे.

Maharashtra Politics
Video: शिवसेनेची काँग्रेस होऊ देण्यापेक्षा... बाळासाहेबांचा जुना व्हिडिओ बावनकुळेंनी केला शेअर

महाविकास आघाडीत नंदुरबार लोकसभेची जागा काँग्रेसला सुटणार असून महाविकास आघाडीच्या घटक पक्ष असलेल्या ठाकरे गटातील विधान परिषदेचे आमदार आमश्या पाडवी हे देखील लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असून त्यांनी नंदुरबार लोकसभेसाठी तिकिटाची मागणी केली होती.

महाविकास आघाडीकडनं तिकीट मिळत नसल्याने ते नाराज असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली असून नंदुरबार जिल्ह्यातील आदिवासी चेहरा म्हणून ओळख असलेल्या आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातील विधान परिषदेचे आमदार आमश्या पाडवी हे आपल्या कार्यकर्त्यांसोबत आज मुंबई येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेना शिंदे गटात प्रवेश प्रवेश करणार असल्याची माहिती आहे.

Maharashtra Politics
Maharashtra Weather Update: शेतकऱ्यांची चिंता वाढली! राज्यावर पुन्हा अवकाळी पावसाचं सावट, नागपूरसह 'या' जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.