Ajit Pawar: 'शरद पवार जिथे सभा घेतील त्याठिकाणी...', अजित पवार गटाचा मोठा निर्णय

अजित पवार गटानं पक्षाच्या सभांबाबत मोठा निर्णय घेतला आहे
Ajit Pawar VS Sharad Pawar
Ajit Pawar VS Sharad PawarEsakal
Updated on

राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी त्यांच्या ८ आमदारांसह भाजप-शिवसेना पक्षाला पाठिंबा दिला. त्यानंतर राष्ट्रवादी पक्षामध्ये दोन गट पडले. अजित पवार यांच्या या निर्णयानंतर शरद पवार यांनी राज्यभरात दौरे आणि पुन्हा पक्ष बांधणीसाठी दौरे, बैठका घेणार असल्याची घोषणा केली. त्यानुसार शरद पवार यांचे राज्यभरात सभा, दौरे सुरू आहेत. दरम्यान शरद पवार यांच्या सभेला उत्तर देण्याकरता अजित पवार गटाकडून देखील सभा घेण्यात येत आहेत.

अशातच अजित पवार गटाकडून मोठा निर्णय घेण्यात आला आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची जिथे सभा होईल तिथे उत्तरसभा न घेण्याचा निर्णय अजित पवार गटाकडून घेण्यात आल्याची माहिती मिळत आहे. त्या ठिकाणी सभा घेण्याऐवजी आमदारांच्या मतदारसंघातील प्रश्न सोडवण्यावर अजित पवार गटाकडून लक्ष केंद्रीत केलं जाणार असल्याची माहिती आहे.

Ajit Pawar VS Sharad Pawar
"मुलींना लखपती करणार ते खंडकरी शेतकऱ्यांना १ एकरापेक्षा कमी जमीन मिळणार"; मंत्रिमंडळाच्या बैठकीतील महत्वाचे निर्णय!

उत्तर सभा घेण्यापेक्षा पक्ष संघटनेवर आणि मतदारांना पक्षासोबत जोडण्यावर भर देण्याचा निर्णय अजित पवार गटाकडून घेण्यात आल्याची माहिती आहे. मंत्र्यांना आमदारांची कामं तक्ताळ करून देण्याबाबत देखील सूचना देण्यात आल्याची माहिती आहे.

Ajit Pawar VS Sharad Pawar
Lalit Patil Drugs Case: ड्रग्ज माफिया ललित पाटीलच्या भावाला वाराणसीतून अटक; पुणे पोलिसांची मोठी कारवाई

शरद पवारांच्या सभेनंतर अजित पवार गटांचा उत्तर सभा न घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यापूर्वी नाशिक, बीड, जळगाव आणि कोल्हापूर येथे शरद पवारांच्या झालेल्या सभेनंतर अजित पवार गटाच्या देखील सभा झाल्या होत्या. मात्र, आता उत्तर सभा न घेण्याची अजित पवार गटांची भूमिका आहे. शरद पवार गटाला उत्तर देण्याऐवजी कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी संघटना मजबूत करावी, अशा सूचना देण्यात आल्याची माहिती आहे. यासंबधीचे वृत्त साम टिव्हीने सुत्रांच्या हवाल्याने दिले आहे.

Ajit Pawar VS Sharad Pawar
Ajit Pawar: राष्ट्रवादीला महायुतीत १०० दिवस पूर्ण! अजित पवारांनी सांगितलं यशवंतरावांचे सुत्र, शरद पवारांचा उल्लेख टाळला

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.