मोठी बातमी! ‘एसईबीसी’चे 6000 दाखले पुन्हा काढावे लागणार; शेकडो अर्ज प्रांताधिकाऱ्यांकडे पेन्डिंग; पूर्वीचा निर्णय रद्द, शासनाचे नवे शुद्धीपत्रक

मराठा आरक्षणानंतर राज्यातील सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गीय कुटुंबांना ‘एसईबीसी’चे प्रमाणपत्र वितरित करण्यात आली. एसईबीसी व नॉन क्रिमीलेअर दोन्ही एकत्रितच मिळत होते आणि त्याची मुदत तीन वर्षांपर्यंत होती.
solapur
mantralaysakal
Updated on

सोलापूर : मराठा आरक्षणानंतर राज्यातील सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गीय कुटुंबांना ‘एसईबीसी’चे प्रमाणपत्र वितरित करण्यात आली. एसईबीसी व नॉन क्रिमीलेअर दोन्ही एकत्रितच मिळत होते आणि त्याची मुदत तीन वर्षांपर्यंत होती. आता राज्याच्या सामान्य प्रशासन विभागाने १५ मार्चच्या शासन निर्णयात बदल करून नवे शुद्धीपत्रक काढले आहे. त्यामुळे १५ मार्च ते २८ जूनपर्यंत ‘एसईबीसी’ प्रमाणपत्र काढलेल्या जिल्ह्यातील जवळपास सहा हजार तरुण-तरुणींना पुन्हा नव्याने प्रमाणपत्रे काढावी लागणार आहेत.

जिल्ह्यातील पाच हजार ३८९ जणांना जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून १५ मार्च ते १३ मे या काळात ‘एसईबीसी’ची प्रमाणपत्रे वितरित केली आहेत. त्यानंतरही १४ मे २८ जून या काळात देखील एक हजारांहून अधिक जणांना प्रमाणपत्रे देण्यात आली आहेत. दुसरीकडे जिल्ह्यातील सर्वच प्रांताधिकाऱ्यांकडे जुन्याच शासन निर्णयानुसार करण्यात आलेले दीड हजारांपर्यंत अर्ज प्रलंबित आहेत. त्या अर्जांवर निर्णय कसा घ्यायचा, यासंदर्भात प्रांताधिकारी देखील संभ्रमात असल्याची स्थिती आहे. जात पडताळणी समितीकडे देखील ‘व्हॅलिडीटी’साठी अनेक अर्ज प्रलंबित आहेत.

नवीन शुद्धीपत्रकानुसार १५ मार्च २०२४ चा शासन निर्णय रद्द करण्यात येत असून सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्ग प्रवर्गासाठी जात प्रमाणपत्र व नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र देण्यासाठी याद्वारे सुधारित परिशिष्ट- अ आणि परिशिष्ट- ब स्वतंत्र पृष्ठांवर विहित करण्यात येत असल्याचे नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे पूर्वीचे दाखले काढलेल्यांना आता पुन्हा नवे दाखले तथा प्रमाणपत्र काढावे लागतील, असे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी नाव न छापण्याच्या अटीवर ‘सकाळ’शी बोलताना सांगितले.

जात पडताळणी समितीही संभ्रमात

१५ मार्चच्या शासन निर्णयानंतर सोलापूरसह राज्यभरातील हजारो तरुण-तरुणींनी शिक्षणासह विविध कारणास्तव ‘एसईबीसी’ची प्रमाणपत्रे काढली. त्या प्रमाणपत्राच्या आधारावर २८ जूनपूर्वी ज्या ज्या विद्यार्थ्यांनी जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडून व्हॅलिडीटी करून घेतली आहे, त्यांच्याकडील प्रमाणपत्रे आता ग्राह्य धरली जाणार का, असाही संभ्रम आहे.

ऐन प्रवेश प्रक्रियेच्या काळातच शुद्धीपत्रक

इयत्ता बारावीसह पदवी-पदव्युत्तर परीक्षांच्या निकालानंतर आता पुढील वर्षाची प्रवेश प्रक्रिया सुरू आहे. तंत्रनिकेतनचे प्रवेशही सध्या सुरू आहेत. दुसरीकडे काही शासकीय विभागांची भरती होईल. अशावेळी राज्य शासनाने काढलेल्या शुद्धीपत्रकामुळे २८ जूनपूर्वी ‘एसईबीसी’चे दाखले काढलेल्या तरुण-तरुणींची पंचाईत होईल, अशी स्थिती आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.