Eknath Shinde : मोठी बातमी! शिवसेनेच्या पक्षप्रमुखपदी नव्हे तर या पदावर झाली एकनाथ शिंदेंची निवड

CM Eknath Shinde
CM Eknath Shindeesakal
Updated on

मुंबई - केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना पक्षाचे नाव आणि धनुष्यबाण चिन्ह एकनाथ शिंदे गटाला दिले आहे. त्यानंतर प्रथमच शिंदे गटाने अधिकृत शिवसेना पक्षाची कार्यकारणीची बैठक घेतली. या बैठकीत एकनाथ शिंदे यांची शिवसेना पक्षप्रमुखपदी नव्हे तर पक्षाच्या मुख्य नेतेपदी निवड झाली आहे.

या निवडीमुळे शिवसेना पक्षाचे सर्वाधिकार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे असणार आहे. आजच्या बैठकीत, शिंदे यांची निवड पक्षप्रमुखपदी होणार अशी चर्चा होती. मात्र शिंदे शिवसेनेच्या मुख्यनेतेपदी कायम आहेत.

CM Eknath Shinde
“…म्हणून आम्हाला सावध राहावं लागणार” महादेव जानकरांचं मोठं विधान Mahadev Jankar

याबाबत शिवसेनेचे नेते उदय सामंत यांनी माहिती दिली. ते म्हणाले की, यावेळी अनेक ठराव संमत झाले. तसेच निवडणूक आयोगाने घालून दिलेल्या नियमावलीनुसारच सर्व निर्णय झाल्याचं ते म्हणाले. घटनेला अनुसरूनच एकनाथ शिंदे यांनी कार्यकारणीला संबोधित केलं आहे. तसेच कोणाच्याही संपत्तीवर आणि अकाऊंटवर मालमत्तेवर आमचा अधिकार दाखवणार नाही. आम्ही बाळासाहेबांचा विचार घेऊन पुढं चालल्याचं शिंदे यांनी स्पष्ट केल्याचं सामंत यांनी सांगितलं.

CM Eknath Shinde
Raju Shetty : वीज दरवाढ व शेतीमालाच्या प्रश्नावर राज्यभरात चक्का जाम आंदोलन

शिवसेनेच्या कार्यकारिणीमध्ये अनेक महत्त्वाचे ठराव झाले. यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुख्य नेतेपदी कायम आहे. त्यामुळे पक्षाचे सर्वाधिकार शिंदे यांच्याकडे देण्यात आले. यावेळी मराठी अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा ठराव झाला. ८० टक्के भूमिपुत्रांना नोकरी देण्याचा ठरावही करण्यात आला. तसेच वि.दा. सावरकर यांना मरणोपरांत भारतरत्न देण्याचा ठरावही घेण्यात आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.