मोठी बातमी! ‘कास्ट व्हॅलिडीटी’साठी ना अध्यक्ष, ना पुरेसे DYSP ना पीआय; राज्यातील ‘या’ 26 जात प्रमाणपत्र पडताळणी समित्यांना मिळेना पूर्णवेळ अध्यक्ष

राज्यातील कास्ट व्हॅलिडीटी समित्यांकडे जात प्रमाणपत्र पडताळणीसाठी दररोज पाच हजारांपर्यंत अर्ज दाखल होत आहेत. पण, ३६ पैकी तब्बल २३ समित्यांना पूर्णवेळ अध्यक्ष नाहीत. दुसरीकडे दक्षता पथकासाठी ३६ पोलिस उपअधीक्षक व ३६ पोलिस निरीक्षकांची गरज असतानाही तीन पोलिस निरीक्षक व १० उपअधीक्षक नाहीत, अशी वस्तुस्थिती आहे.
solapur
caste validity and caste certificateesakal
Updated on

सोलापूर : राज्यातील कास्ट व्हॅलिडीटी समित्यांकडे जात प्रमाणपत्र पडताळणीसाठी दररोज पाच हजारांपर्यंत अर्ज दाखल होत आहेत. पण, ३६ पैकी तब्बल २३ समित्यांना पूर्णवेळ अध्यक्ष नाहीत. दुसरीकडे दक्षता पथकासाठी ३६ पोलिस उपअधीक्षक व ३६ पोलिस निरीक्षकांची गरज असतानाही तीन पोलिस निरीक्षक व १० उपअधीक्षक नाहीत, अशी वस्तुस्थिती समोर आली आहे. महसूल विभागाकडे पदोन्नतीचा विषय प्रलंबित असल्याने समित्यांना पूर्णवेळ अध्यक्ष मिळाले नसल्याचे सूत्रांनी सांगितले.

सोलापूरसह सातारा, कोल्हापूर, नगर, नागपूर, अकोला, जालना, बीड यासह २३ जिल्ह्यांच्या जात प्रमाणपत्र पडताळणी समित्यांना पूर्णवेळ अध्यक्ष नाहीत. दुसरीकडे मराठा आरक्षणानंतर एसईबीसी व कुणबी नोंदी सापडलेल्या कुटुंबातील विद्यार्थ्यांकडूनही जात प्रमाणपत्र पडताळणीसाठी अर्ज करण्यात आले आहेत. काही अर्जांमधील कागदपत्रांमध्ये खाडाखोड तर काही अर्जदारांची वंशावळ जुळत नाही.

अशावेळी दक्षता पथकांच्या माध्यमातून त्या अर्जदाराच्या गावात जावून चौकशी केली जाते. त्यासाठी पोलिस उपअधीक्षक व पोलिस निरीक्षक नेमले जातात. त्यातही तीन पोलिस निरीक्षक व दहा पोलिस उपअधीक्षक समित्यांना मिळालेले नाहीत. अशा स्थितीत कामकाज करणाऱ्या समाजकल्याण विभागाने महसूल विभागाला वारंवार पत्रव्यवहार करून पूर्णवेळ अध्यक्षांची मागणी केली आहे. दुसरीकडे गृह विभागाला पत्रव्यवहार करून त्यांच्याकडूनही समित्यांसाठी आवश्यक मनुष्यबळ मिळावे, अशी विनंती केली आहे. मात्र, दोन्ही विभागांकडून समाजकल्याण विभागाला पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध झालेले नाही. कमी मनुष्यबळामुळे राज्य सरकारला विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी लागणारे कास्ट व्हॅलिडीटी प्रमाणपत्र सादर करण्यास तीन महिन्यांची मुदत द्यावी लागली आहे.

‘महसूल’ला पाठविलेले पत्र

सीईटी, जेईई, नीट परीक्षेच्या निकालानंतर जात प्रमाणपत्र पडताळणीसाठी विद्यार्थ्यांचे अर्ज मोठ्या प्रमाणावर समित्यांकडे प्राप्त होत आहेत. विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी कोणत्याही अडचणी येवू नयेत, यासाठी राज्यातील सर्वच समित्यांना नियमित तथा पूर्णवेळ अध्यक्ष मिळावेत. जेणेकेरून जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समित्यांकडे प्राप्त अर्जांवर वेळेत निर्णय घेणे शक्य होईल, असे पत्र समाजकल्याण विभागाकडून महसूल विभागाला पाठविण्यात आले आहे. प्रत्येक तीन महिन्यातून एकदा पत्र पाठवूनही राज्यातील २३ समित्यांना अद्याप पूर्णवेळ अध्यक्ष मिळालेले नाहीत हे विशेष.

जात पडताळणी समित्यांची स्थिती

  • एकूण समित्या

  • ३६

  • पूर्णवेळ अध्यक्ष

  • १३

  • पोलिस निरीक्षक

  • ३३

  • पोलिस उपअधीक्षक

  • २६

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.