Maharashtra Politics : विधानसभेपूर्वी महायुतीत राजकीय भुकंप होणार? ठाकरे-पवार मोठा धक्का देण्याच्या तयारीत

Assembly Election maharashstra Politics : येत्या काही दिवसात नवी मुंबईच्या राजकारणात मोठा राजकीय भुकंप होणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
Maharashtra Politics
Maharashtra Politicssakal
Updated on

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला आहे. सर्वच राजकीय पक्ष या निवडणुकीसाठी मोर्चेबांधणी करण्याच्या प्रयत्नात आहेत. ही विधानसभा निवडणुक महायुतीसाठी महत्वाची ठरणार आहे. कारण महायुतीमधील पक्षांना लोकसभा निवडणुक २०२४ मध्ये अपेक्षेप्रमाणे कामगिरी करता आली नाही. यानंतर भाजप, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेना तसेच अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून राज्यातील विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेतला जात आहे. असे असतानाच महाविकास आघाडी सोडून महायुतीत सामील झालेले अनेक नेते पुन्हा परतीच्या वाटेवर असल्याच्या चर्चांना उत आला आहे.

राजकीय वर्तुळात सुरू असलेल्या या चर्चेदरम्यान नवी मुंबईत एक राजकीय भुंकप होणार असल्याची माहिती समोर आली आहे. अगदी काही आठवड्यांवर येऊन ठेपलेल्या विधानसभा निवडणुकीपूर्वी हा राजकीय भूकंप होण्याची शक्यता आहे. नवी मुंबईतील एक मोठं राजकीय कुटुंब महाविकास आघाडीत सहभागी होणार असल्याचे बोलले जात आहे. साम टीव्हीने यासंबंधीचे वृत्त दिले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, या राजकीय कुटुंबाचे त्यांच्या पक्षातील नेत्यांसोबत वाद सुरू आहेत. त्यामुळे ही मंडळी शरद पवार आणि उद्धव ठाकेर यांच्या संपर्कात असल्याचे सांगितले जात आहेत. जर हे राजकीय कुटुंब महाविकास आघाडीत सामील झाले तर याचा थेट फटका महायुतीला बसणार आहे. त्यामुळे शरद पवार आणि उद्धव ठाकरे हे लवकरच महायुतीला मोठा धक्का देऊ शकतात.

Maharashtra Politics
Maharashtra Politics : विधानसभेपूर्वी शरद पवारांची ताकद वाढली! सदाभाऊ खोतांच्या पक्षातील बडा नेता लागला गळाला

नेमकं हे राजकीय कुटुंब कोणतं?

दरम्यान नवी मुंबईतील हे मोठं राजकीय कुटुंब नेमकं कोणतं आहे? याबद्दल राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. विधानसभा निवडणुक जवळ येईल तसे येत्या काही दिवसात राज्यात अनेक मोठे उलटफेर होतील अशी शक्यता वर्तवली जात आहे. अनेक नेते आपला पक्ष सोडून इतर पक्षात जाण्याची देखील शक्यता आहे. यामध्ये भाजपमधील नाराज , तसेच एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील उमेदवारीसाठी इच्छुकांचा समावेश असण्याची शक्यता आहे.

Maharashtra Politics
...मग हा दांभिकपणा कशासाठी? सुप्रीम कोर्टाच्या SC-STबाबतच्या निर्णयावरून आंबेडकरांनी दाखवला आरसा, नेमकं काय म्हणाले?

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.