Navneet Rana: अमरावतीच्या खासदार नवनीत कौर राणा यांच्या अनुसूचित जातीचे प्रमाणपत्र बोगस ठरवणाऱ्या मुंबई उच्च न्यायालयाच्या निकालाला आव्हान देणाऱ्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने निकाल देत राणांना मोठा दिलासा दिला आहे. नवनीत राणा अमरावती लोकसभा मतदार संघातून भाजपकडून आज उमेदवारी अर्ज भरणार आहेत. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानंतर त्यांचा निवडणूक लढवण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
नवनीत राणा यांना मोठा दिलासा मिळाला आहे. सुप्रीम कोर्टाने जात प्रमाणपत्र वैध ठरवलं आहे. आता त्यांचा निवडणूक लढवण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
मुंबई उच्च न्यायालयाने नवनीत राणा यांचं जात प्रमाणपत्र बोगस ठरवलं होतं. २०१९ उमेदवारी अर्ज भरताना बनावट जात प्रमाणपत्र दिल्याचा आरोप राणा यांच्यावर करण्यात आला होता. दरम्यान आज सर्वोच्च न्यायालयाने नवनीत राणा यांचं जात प्रमाणपत्र वैध ठरवलं आहे.
नवनीत राणा भाजपच्या कमळावर अमरावतीतून खासदारकीची निवडणूक लढवणार आहेत. त्यांनी प्रचाराला देखील सुरुवात केली आहे. त्यांनी आज मंदिरात जाऊन दर्शन घेतले. आज त्या उमेदवारी अर्ज देखील भरणार आहेत.
२०१९ ला नवनीत राणा अपक्ष खासदार होत्या. आता त्या भाजपच्या उमेदवार आहेत. राणा यांनी २०१४ मध्ये राष्ट्रवादीच्या तिकिटावर पहिल्यांदा अमरावतीमधून निवडणूक लढवली आणि शिवसेनेच्या आनंदराव अडसूळ यांच्याकडून त्यांचा पराभव झाला. २०१९ मध्ये त्यांनी राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर अपक्ष म्हणून निवडणूक लढवली आणि अडसूळ यांचा पराभव केला.
गेल्या महिन्यात, सर्वोच्च न्यायालयाने नवनीत राणा यांच्या जात प्रमाणपत्र रद्द करण्याच्या मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या याचिकेवरील निर्णय राखून ठेवला होता. ८ जून २०२१ रोजी उच्च न्यायालयाने सांगितले की, 'मोची' जात प्रमाणपत्र बनावट कागदपत्रांचा वापर करून फसवणूक करून मिळवले गेले. अमरावतीच्या खासदाराला २ लाखांचा दंडही ठोठावला होता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.