Rohit Pawar : आमदार रोहित पवार यांच्यावर मोठी जबाबदारी; आता विद्यापीठ...

Rohit Pawar
Rohit Pawaresakal
Updated on

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांची राज्य विधानमंडळाने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अधिसभेवर नियुक्ती केली आहे. त्यांच्या या नियुक्तीचे विद्यार्थ्यांकडून स्वागत केले जात आहे. (Rohit Pawar news in Marathi)

Rohit Pawar
Narendra Modi : पहिल्यांदाच एखाद्या पंतप्रधानाने असं केलं; 'या' राज्याच्या CM ची मोदींवर टीका

आमदार रोहित पवार यांनी शासनाकडे वेळोवेळी विद्यार्थ्यांचे प्रश्न मांडून ते सोडवण्याचा प्रयत्न केला आहे. यापुढे ‘एमपीएससी’ची परीक्षा बहुपर्यायी न होता ‘युपीएससी’च्या धर्तीवर वर्णनात्मक पद्धतीने होणार आहे. परंतु हा निर्णय लगेचच लागू न करता २०२५ पासून लागू करण्याची विद्यार्थ्यांची मागणी होती आणि त्यासाठी हे विद्यार्थी रस्त्यावर उतरले होते. या प्रश्नी आमदार रोहित पवार यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांची भेट घेऊन विद्यार्थ्यांची बाजू मांडली होती.

दरम्यान सरकारने विद्यार्थ्यांच्या बाजूने निर्णय घेतला. तसेच पुण्यात विश्रांतवाडी येथील बांधकाम पूर्ण झालेले शासकीय वसतीगृह तातडीने सुरु करण्याचा विषयावर आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेतील अडचणी दूर करण्याच्या विषयावरही त्यांनी आवाज उठवला आहे.

Rohit Pawar
मुझे प्यार हुआ....नवनीत राणा रोमँटिक, पतीदेव लाजले, Video Viral

याआधी रोहित पवार यांची ‘महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन’च्या अध्यक्षपदी देखील निवड झाली आहे. त्यापाठोपाठ आता पुणे विद्यापीठाच्या सिनेटवर त्यांची नियुक्ती झाली आहे. अर्थात रोहित पवार यांना आणखी एक जबाबादारी मिळाली आहे.

माझ्या पक्षाने आणि विधिमंडळाने माझ्यावर विश्वास टाकत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अधिसभेवर नियुक्ती केल्याबद्दल मी पक्षाचा, विधानमंडळाचा आणि अध्यक्ष राहुलजी नार्वेकर यांचा आभारी आहे. अभ्यासक्रमापासून, परिक्षा शुल्क, वसतीगृह, स्कॉलरशीप, ॲडमिशन असे विद्यार्थ्यांचे अनेक प्रश्न आहेत. याबाबत माझी विद्यार्थ्यांसोबत नियमित चर्चाही होत असते. पुढील काळात हे प्रश्न सोडवण्यासाठी मी प्रामाणिक प्रयत्न करील, असं रोहित पवार यांनी म्हटलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.