Dhangar Reservation : धनगर आरक्षणाबाबत देवेंद्र फडणवीसांनी घेतलाय महत्त्वपूर्ण निर्णय; आमदार गोरेंची माहिती

महापुरुषांना समाजापुरते संकुचित करण्याचे पापही अलीकडच्या काळात काही प्रवृत्ती जाणीवपूर्वक करत आहेत.
Devendra Fadnavis Dhangar reservation Jaykumar Gore
Devendra Fadnavis Dhangar reservation Jaykumar Goreesakal
Updated on
Summary

धनगर समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे. मात्र, त्यामध्ये अनेक अडचणी आहेत.

लोणंद : ‘पुण्यश्‍लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर (Ahilya Devi Holkar) यांनी समाजातील प्रत्येक घटकाचे जीवनमान सुखी व आनंदी होण्यासाठी विकासात्मक व न्याय भूमिकेतून सर्वसमावेशक असा आदर्श राज्यकारभार केला. त्यांचा आदर्श व विचार अंगीकारून समाजाने आज काम करण्याची गरज आहे,’ असे प्रतिपादन भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार जयकुमार गोरे (Jaykumar Gore) यांनी केले.

दरम्यान, महापुरुषांना समाजापुरते संकुचित करण्याचे पापही अलीकडच्या काळात काही प्रवृत्ती जाणीवपूर्वक करत असल्याची टीकाही त्यांनी केली. येथील राजमाता प्रतिष्ठानच्या वतीने राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचा जयंती महोत्सव, स्मारक सुशोभीकरण भूमिपूजन व समाजरत्न पुरस्कार वितरण समारंभात आमदार गोरे बोलत होते. या वेळी खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर अध्यक्षस्थानी होते.

याप्रसंगी आमदार महेश शिंदे, राजमाता प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष आनंदराव शेळके-पाटील, धनगर ऐक्य परिषदेचे अध्यक्ष शशिकांत तरंगे, विराज शिंदे, अनुप सूर्यवंशी, अॅड. प्रियदर्शनी कोकरे, रमेश धायगुडे-पाटील, चंद्रकांत यादव, बापूराव धायगुडे-पाटील, ऋषीकेश धायगुडे-पाटील, सुभाषराव क्षीरसागर, ईश्‍वर ठोंबरे, तृप्ती घाडगे, दीपाली संदीप शेळके, राजश्री शेळके, ज्योती डोणीकर, चारुशीला भिसे, निलांबरी बुणगे, बाळासाहेब जाधव, अॅड. वैभव धायगुडे, प्रदीप माने, अतुल पवार, संजयसिंह देशमुख, रमेश कर्नवर, तारिक बागवान, बापूराव क्षीरसागर, हिरालाल धायगुडे आदी प्रमुख उपस्थित होते.

Devendra Fadnavis Dhangar reservation Jaykumar Gore
Koregaon : मस्तीचा बैल चालत नसतो, त्याला वेसण..; राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याचा कोणाला इशारा?

आमदार गोरे म्हणाले, ‘‘अहिल्यादेवींना दिव्य दूरदृष्टी होती. राजकारण, समाजकारण करताना त्यांनी तीनशे वर्षांपूर्वी तलाव बांधले पाहिजे, पाणी अडवले पाहिजे, हे सांगितले होते. मात्र, हे समजायला तीनशे वर्षे गेली. आता साखळी बंधारे बांधले जात आहेत.’’

धनगर समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे. मात्र, त्यामध्ये अनेक अडचणी आहेत. या समाजाचा सन्मान करताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धनगर समाजाला आरक्षणाने मिळणाऱ्या सर्व सवलती आरक्षण मिळेपर्यंत देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णयही घेतला, असे सांगून श्री. गोरे म्हणाले, ‘‘खंडाळ्यातील जनतेने आपल्या हक्काच्या नीरा-देवघरच्या पाण्यासाठी जागृत होऊन संघर्ष केला पाहिजे.’’

Devendra Fadnavis Dhangar reservation Jaykumar Gore
Karad Crime : यात्रेतलं मांसाहारी जेवण पडलं महागात; 25 जणांना विषबाधा, 'इतक्या' जणांचा मृत्यू

तरंगे म्हणाले, ‘‘धनगर समाजाला हक्काचे आरक्षण मिळाल्याखेरीज या समाजाचा प्रश्‍न मिटणार नाही.’’ यावेळी आनंदराव शेळके-पाटील, अॅड. प्रियदर्शनी कोकरे यांचीही भाषणे झाली. अहिल्यादेवी स्मारक सुशोभीकरण कामाचा प्रारंभ खासदार निंबाळकर, आमदार गोरे व आमदार शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला.

Devendra Fadnavis Dhangar reservation Jaykumar Gore
Cyclone Biparjoy : गणपतीपुळेला जाण्याचा विचार करताय? मग ही बातमी आधी वाचा, अन्यथा होऊ शकतं नुकसान!

पोलिस उपअधीक्षक राजेंद्र शेळके-पाटील, प्रतीक कराडे, उत्तम धायगुडे, तुषार भिसे, डी. बी. धायगुडे, दादासाहेब धायगुडे, बबनराव ठोंबरे, तानाजी धायगुडे, संपत कराडे, साहेबराव सोडनवर, डी. जी. कचरे, जे. बी. धायगुडे, धनंजय धायगुडे व निखिल धायगुडे यांना समाजरत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. हर्षवर्धन शेळके-पाटील यांनी प्रास्ताविक केले.

अमोल शेळके, बंटी शेळके, पोलिस निरीक्षक रवींद्र शेळके, सेवानिवृत्त पोलिस उपअधीक्षक मारुतराव कराडे, दीपाली शेळके, संदीप शेळके, बाळकृष्ण भिसे, नीलेश शेळके, आनंदराव व्हटकर, धनाजी धायगुडे, वैभव ठोंबरे यांनी स्वागत केले. ओंकार कर्नवर यांनी आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.