आज ना उद्या देशाच्या संसदेला आर्थिक निकषावर आरक्षण द्यावंच लागेल; शिवेंद्रराजेंचं मोठं विधान

मराठा आरक्षणाचा (Maratha Reservation) विषय आल्यानंतर धनगर, मुस्लिम आरक्षणासाठी लढे सुरू झाले. ओबीसी एकवटले आहेत.
MLA Shivendraraje Bhosale
MLA Shivendraraje Bhosaleesakal
Updated on
Summary

'आर्थिक निकषावर आरक्षण द्यावे लागेल. ज्याचे उत्पन्न कमी त्याला आर्थिक निकषावर आरक्षण द्यायला हवे. मग तो मराठा असो, ब्राह्मण असो, मुस्लिम असो की, मागासवर्गीय असो.'

चिपळूण : एक ना एक दिवस भारतात आर्थिक निकषावर आरक्षण द्यावे लागेल. संसदेलाही तसा निर्णय घ्यावा लागेल, असे मत साताऱ्याचे आमदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंह भोसले (Shivendraraje Bhosale) यांनी व्यक्त केले. पुणे येथील राजेशिर्के प्रतिष्ठान या संस्थेच्या दहाव्या वर्धापनदिनी सावर्डे येथील भागीरथीबाई राजेशिर्के सभागृहात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

कार्यक्रमाला आमदार शेखर निकम, एमपीएससीचे माजी चेअरमन किशोरराजे निंबाळकर, सातारा पालिकेचे माजी उपनगराध्यक्ष अमोल मोहिते, राजेशिर्के प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुभाष राजेशिर्के, शिरकाई प्रतिष्ठानचे दत्ताजी राजेशिर्के, मार्केटयार्डचे सभापती विक्रम पवार, शिरकाई प्रतिष्ठानचे सुनील राजेशिर्के, रत्नागिरी जिल्हा बँकेचे संचालक राजेंद्र सुर्वे, राजेशिर्के प्रतिष्ठान पुणेचे माजी अध्यक्ष शिवसिंह राजेशिर्के, जिल्हा परिषद माजी सदस्य निकिता सुर्वे आदी उपस्थित होते.

MLA Shivendraraje Bhosale
इतिहासाची 57 वर्षांनी पुनरावृत्ती! इंदिरा गांधी यांच्यानंतर कुटुंबाचा 'हा' सदस्य राज्यसभेत जाणार

प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुभाष राजेशिर्के यांनी सरकारी नोकऱ्यांची संख्या कमी आहे, त्यामुळे त्यावर अवलंबून न राहता व्यवसायाकडे वळा, असे आवाहन केले. या प्रसंगी आमदार भोसले म्हणाले, आज ना उद्या देशाच्या संसदेला आर्थिक निकषावर आरक्षणाचा निर्णय घ्यावा लागेल. मराठा आरक्षणाचा (Maratha Reservation) विषय आल्यानंतर धनगर, मुस्लिम आरक्षणासाठी लढे सुरू झाले. ओबीसी एकवटले आहेत. समाजात जातीय तेढ निर्माण झाले आहे.

MLA Shivendraraje Bhosale
कोल्हापुरात आजपासून शिवसेनेचे राष्ट्रीय अधिवेशन, अर्धा डझन मंत्री-नेत्यांची उपस्थिती; शहरात उभारले 100 होर्डिंग्ज, 700 फलक

उद्या एखाद्याला आरक्षण दिले की, दुसरा रूसणार आणि तिसरा आंदोलन करणार. त्यामुळे आरक्षणाचा तिढा तेढ निर्माण करणारा आहे. देशाच्या एकसंघतेला धोकादायक आहे. या वेळी आमदार शेखर निकम यांनी प्रतिष्ठानच्या कामाचे कौतुक करताना कुटुंबातील सदस्य म्हणून संवाद साधताना आनंद होतो. कसबा येथे छत्रपती संभाजी महाराजांचे स्मारक उभारण्याचा प्रयत्न सुरू आहे तसेच शृंगारपूर येथे महाराणी येसूबाईंचे स्मृतिस्थळ उभारण्यासाठीही आपण प्रयत्न करू, अशी ग्वाही या वेळी दिली.

MLA Shivendraraje Bhosale
Rajyasabha Election : धजद-भाजप युतीच्या पाचव्या उमेदवारामुळं चुरस वाढली; काँग्रेसमध्ये प्रचंड घबराट

..तरच आरक्षणाचा तिढा सुटेल

आर्थिक निकषावर आरक्षण द्यावे लागेल. ज्याचे उत्पन्न कमी त्याला आर्थिक निकषावर आरक्षण द्यायला हवे. मग तो मराठा असो, ब्राह्मण असो, मुस्लिम असो की, मागासवर्गीय असो. तो लाभ त्याला मिळायला हवा तरच आरक्षणाचा तिढा सुटेल. आज ना उद्या आर्थिक निकषावर आरक्षण द्यावे लागेल असे मत शिवेंद्रसिंह भोसले यांनी व्यक्त केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.