मुंबई बॉम्बस्फोटातील प्रमुख आरोपी सलिम कुत्ता याच्यासोबत ठाकरे गटाचे नेते सुधाकर बडगुजर यांचा फोटो भाजप आमदार नितेश राणे यांनी शुक्रवारी विधानसभेत दाखवला. त्यामुळं राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली.
पण यावरुन ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी नितेश राणे यांना चांगला अभ्यास करण्याचा खोचक सल्ला देत त्यांनी दाखवलेल्या पार्टीचा एक व्हिडिओच समोर आणला यामध्ये भाजपचे नेते गिरीश महाजन उपस्थित असल्याचं दिसून येत आहे. (Big twist in Salim Kutta case Sushma Andhare tweet a video showing presence of BJP Girish Mahajan)
फडणवीस ब्रिगेड अभ्यास करत नाही
अंधारे यांनी यासंदर्भात म्हटलं की, "देवेंद्र फडणवीस यांची बिग्रेड अभ्यास करत नाही. नितीश राणे यांनी आज एक फोटो सभागृहात झळकला. दाऊदच्या नातेवाईकांच्या लग्नातले जे फोटो दाखवले ते दोन वर्षांपूर्वीचे आहेत. नितेश राणे यांनी फोटो दाखवला मी संपूर्ण व्हीडीओ दाखवते. यामध्ये भाजप नेते मंत्री पालकमंत्री गिरीश महाजन, विकांत चांदवडकर, बाळासाहेब सानप दिसत आहेत" (Latest Marathi News)
महाजनांचं नाव वगळण्याच्या बातम्या आल्या
या पार्टीत आमचा कोणी नेता असेल तर कारवाई करा पण बाकी पण त्यात कोण आहे ते पण पहा. दोन वर्षांपूर्वी महाजन यांच नाव वगळलं जाणार असं सागितलं जातंय अशा बातम्याही त्यावेळी झाल्या होत्या. (Marathi Tajya Batmya)
नितेश राणेंनी तो व्हिडिओ देखील पाहवा. गिरीश महाजन यांना कोणी सागितलं नाही का? ते का गेले होते, महाजन यांना कोणी विचारत नाहीये का? फडणवीसांनी याची पण माहिती घ्यावी आणि दोषी असेल तर कारवाई करावी. कारण या पार्टीत आमदार देवयानी फरांदे, आमदार सीमा हिरे हे सगळे उपस्थित होते. याची पण चौकशी करा.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.