Sameer Wankhede : समीर वानखेडे प्रकरणात मोठी अपडेट, NCB चा गंभीर आरोप!

Sameer Wankhede
Sameer Wankhede
Updated on

आर्यन खान ड्रग्जप्रकरणी सीबीआयने एनसीबीचे माजी अधिकारी समीर वानखेडे यांची आज सकाळी अडीच तास चौकशी केली. काल (शनिवारी) देखील त्यांची पाच तास चौकशी करण्यात आली. दरम्यान आजच्या चौकशीत मोठी माहिती समोर आली आहे.

समीर वानखेडे यांनी शाहरुख खान सोबत झालेल्या चॅटची वरीष्ठ अधिकाऱ्यांना माहिती दिली नव्हती, असा दावा एसीबीने केला आहे. समीर वानखेडे यांनी ही चॅट न्यायालयात दाखल केली. त्यानंतर ती अधिकाऱ्यांना कळाली.

समीर वानखेडे यांनी खासगी व्यक्ती केपी गोसावी यांच्यासंदर्भात देखील उत्तर दिले नाही. याकडे देखील एनसीबीने लक्ष दिले आहे. गोसावीवर अनेक गुन्हे दाखल असूनही त्याला तपासात दाखल केल्याचे उत्तर वानखेडे यांनी दिले नाही. वानखेडे खोटे पुरावे देऊन तपासाला चुकीची दिशा देत असल्याचे देखील एनसीबीने स्पष्ट केले.  

Sameer Wankhede
Raj Thackeray: 'तुम्ही मला मतदान करत नाही'...अन् राज ठाकरेंनी शेतकऱ्यांना खडे बोल सुनावले

एनसीबीच्या तक्रारीवरून सीबीआयने वानखेडे आणि इतर चार जणांवर ११ मे रोजी कथित भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत लाचखोरीच्या तरतुदींनुसार गुन्हा दाखल केला. शुक्रवारी (ता. १९) उच्च न्यायालयाने सीबीआयला वानखेडे यांना २२ मेपर्यंत अटकेची कोणतीही कारवाई न करण्याचे निर्देश दिले होते.

सीबीआयचे आरोप -


१) सीबीआयने नोंदवलेल्या गुन्ह्यात समीर वानखेडे यांच्याविरोधात गंभीर आरोप करण्यात आले आहे. त्यात के. पी. गोसावी हा वानखेडे यांच्यासाठी शाहरूख खानच्या सचिवाशी डील करत होता.
२) वानखेडेंच्या सांगण्यावरून गोसावीने आर्यन प्रकरणात २५ कोटींची मागणी केली होती. या रकमेच्या बदल्यात आर्यनला ड्रग्ज प्रकरणात अडकवणार नाही, असे आश्वासन देण्यात आले होते.
३) वानखेडे यांनी गोसावीला सौद्याच्या पैशाच्या प्रकरणात संपूर्ण सूट दिली होती. गोसावीने १८ कोटींचा सौदा पक्का केला होता. एवढेच नाही, तर गोसावीने ५० लाख रुपये आगाऊ घेतल्याचा सीबीआयचा आरोप आहे.

Sameer Wankhede
BJP VS Shivsena: ‘तुम्हाला पद भाजपमुळं...उदय सामंतांसह दादा भुसेंना भाजप सहमुख्य प्रवक्त्याने सुनावलं

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()