भाजप पदाधिकारी सना खान हत्येप्रकरणी मोठी अपडेट; पोलिसांनी जबलपूर येथून आरोपीला घेतलं ताब्यात

Sana Khan
Sana Khanesakal
Updated on

नागपूरः नागपूरमधील भाजपच्या सक्रिय पदाधिकारी सना खान यांचा खून झाल्याचे स्पष्ट झाले आहे. मागील आठ दिवसांपासून त्या बेपत्ता होत्या. या प्रकरणी पोलिसांनी आज मुख्य आरोपीला ताब्यात घेतलं.

सना खान यांच्या हत्याकांडात अमित साहूचा नोकर जीतेंद्र गौड याला अटक करण्यात आली होती. त्याने सनाचा खून करून मृतदेह हिरन नदीत फेकल्याची कबुली दिली होती. या प्रकरणी पोलिसांनी मुख्य आरोपी अमित साहूला अटक केली आहे.

Sana Khan
Pune Chandani Chowk: "असं निष्ठावंतांचं डावललेलं जिणं"; मेधा कुलकर्णींच्या भावनांचा उद्रेक

मनकापूर पोलिस ठाणे गुन्हे शाखेच्या पथकाने जबलपूर पोलिसांच्या सहकार्याने आरोपीला जबलपूरमध्येच अटक केली. तो मागील १० दिवसांपासून तो तेथे लपून बसलेला होता. पोलिसांचं पथक साहूला नागपूरकडे घेऊन येत आहे.

भाजपा नेत्या सना खान १ ऑगस्ट रोजी जबलपूरमधील मित्र अमित ऊर्फ पप्पू साहू याला भेटण्यासाठी गेल्या होत्या. सना खान अमितच्या घरी मुक्कामी होत्या. अमित आणि सना खान या दोघांमध्ये चांगले संबंध होते. २ ऑगस्टपासून सना बेपत्ता झाल्या होत्या. त्यांच्या आईने मानकापूर पोलिसात बेपत्ता झाल्याची तक्रार दिली होती.

Sana Khan
'जेवढ्या लवकर होईल, देश सोडा', लष्कराने सत्तांतर घडवून आणल्यावर 'या'देशात राहणाऱ्या भारतीयांना निर्देश

आरोपी जबलपूरमध्येच लपून बसल्याची टीप पोलिसांना मिळाली होती. इलेक्ट्रॉनिक सर्व्हेलन्सची मदत घेऊन अमित साहूला जबलपूरमध्येच पकडण्यात आलं. पोलिसांनी सापळा रचून त्याला ताब्यात घेतलं. साहूने चौकशीदरम्यान सना खानची हत्या केल्याची कबुली दिल्याची माहिती मिळत आहे. पोलिस चौकशीदरम्यान अनेक धक्कादायक खुलासे समोर येण्याची शक्यता आहे.

आईने दिली होती तक्रार

सना खान यांच्या आईने तक्रार दिल्याने मानकापूर पोलिसांचे पथक जबलपूरला रवाना झाले होते. अमित शाहू हा फरार झाला होता. त्याने ढाब्याला कुलूप लावले होते. नोकरही गायब झाले होते. त्यानंतर पोलिसांनी तपास करत अमितचा नोकर जीतेंद्र गौड याला अटक केली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.