Graduate Constituency Election: विधान परिषद निवडणुकीमध्ये मोठी अपडेट! कोकण पदवीधर निवडणुकीतून शिवसेना उद्धव ठाकरे गटाची माघार

Graduate Constituency Election: लोकसभा निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर आता आगामी कोकण पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकांकडे राज्याचं लक्ष लागलं आहे.
Graduate Constituency Election
Graduate Constituency ElectionEsakal
Updated on

लोकसभा निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर आता आगामी कोकण पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकांकडे राज्याचं लक्ष लागलं आहे. लोकसभा निवणुकीत एकत्रित लढत मोठ्या प्रमाणात यश मिळवलेल्या महाविकास आघाडीत जागावाटपावरून चर्चा सुरू झाल्या आहेत.

अशातच विधान परिषद निवडणुकीबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. कोकण पदवीधर निवडणुकीतून शिवसेना उद्धव ठाकरे गटाने माघार घेतली आहे. शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलताना आज याबाबतची माहिती दिली आहे. कोकण पदवीधर निवडणूक महाविकास आघाडी तर्फे काँग्रेस लढवणार असल्याची माहितीही राऊत यांनी बोलताना दिली आहे.

Graduate Constituency Election
Alliance with Ajit Pawar: अजित पवारांशी केलेली युती भाजप ब्रँडला धक्का; RSSने मुखपत्रातून सुनावले खडेबोल, म्हणाले 'राज्यात बहुमत असताना...'

संजय राऊत म्हणाले, काल(मंगळवारी) आमची चर्चा झाली. त्यामध्ये नान पटोले देखील होते. आम्ही कोकणातून किशोर जैन यांना उमेदवारी दिली होती. त्यांनी निवडणुकीची तयारी देखील सुरू केली होती. पण काल असं ठरलं रायगडच्या, कोकणच्या जागेवरून आमच्या उमेदवारांनी माघार घ्यावी आणि नाशिकच्या मतदारसंघातून काँग्रेसने माघार घ्यावी, असं एकमत झालं आहे. त्यानुसार आज दुपारपर्यंत दोन्ही उमेदवार माघार घेऊन आम्ही एकमेकांना पाठिंबा देऊ.

Graduate Constituency Election
Maharashtra Weather Update: राज्याच्या या भागात आज बरसणार मुसळधार; पुढील 15 तास हवामान विभागाकडून हायअलर्ट, वाचा हवामान विभागाचा अंदाज

किशोर जैन हे पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते आहेत. त्यांनी काल स्पष्ट सांगितलं. जो पक्षाचा आदेश असेल तो मी पाळेन. त्यांनी मोठी तयारी करून देखील ते आज माघार घेणार आहेत. नाशिकच्या शिक्षक मतदार संघातील काँग्रेसचा जो उमेदवार आहे त्याला माघार घेण्यासाठीच्या सूचना गेल्या आहेत अशी माझी माहिती आहे, त्यामुळे हा विषय संपलेला आहे, असंही पुढे संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

Graduate Constituency Election
शाळांच्या सुट्यांची यादी जाहीर! शाळांना या वर्षी 124 दिवस सुट्या; सार्वजनिक सुट्या 76 दिवस; दिवाळी सुटी 12 दिवसांची तर उन्हाळा सुटी 43 दिवस

महाविकास आघाडीतील ठाकरे गटाने किशोर जैन यांना कोकणमधून उमेदवारी दिली होती मात्र, आता तिथून ठाकरे गटाने माघार घेत काँग्रेसला उमेदवारी दिली आहे.

किशोर जैन कोण आहेत?

रायगडमधील नागोठण्याचे किशोर जैन ह्यांच्या शिक्षणसंस्था असून ते व्यावसायिक आहेत. ते ठाकरे कुटूंबीयांचे एकनिष्ठ म्हणून ओळखले जातात.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.