Water Crisis : ग्रामीण महाराष्ट्रावर ‘पाणीबाणी’चे मोठे संकट; अठराशेवर गावे, चार हजार वाड्यांवर टँकरद्वारे पाणीपुरवठा

राज्यातील तब्बल १८३७ हून अधिक गावे आणि ४३१८ वाड्यांवर पाणीटंचाईचे भीषण संकट ओढवले आहे.
Water Issue
Water Issuesakal
Updated on

मुंबई - राज्यातील तब्बल १८३७ हून अधिक गावे आणि ४३१८ वाड्यांवर पाणीटंचाईचे भीषण संकट ओढवले आहे. ग्रामस्थांसह जनावरांना पिण्याच्या पाण्याचे दुर्भिक्ष निर्माण झाले असून, लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीत याकडे राजकीय पक्षांचे सपशेल दुर्लक्ष झाले आहे.

यंदा पावसाने हुलकावणी दिल्याने मागील वर्षीच्या तुलनेत टँकरच्या संख्येत तब्बल २८ पटींनी वाढ झाली असली, तरी दुष्काळग्रस्त भागात पाण्याचे नियोजन करण्यास सरकारला वेळ मिळालेला नाही. विदर्भ आणि मराठवाड्यात जनावरांच्या चारा आणि पाण्याचे गंभीर संकट उभे राहिल्याने जनावरे विक्रीसाठी बाजारात आणली जात आहेत. मात्र याच कारणामुळे अनेक ठिकाणी दुभत्या जनावरांसह शेतीकामासाठी आवश्यक असलेल्या बैलांचे दरही झपाट्याने उतरले आहेत.

एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यातच संपूर्ण राज्यातल्या धरणांमधील पाणीसाठा ३३.३८ टक्क्यांवर आला आहे. त्यामुळे वाड्यावस्त्यांवर ग्रामस्थांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. मागील वर्षीच्या तुलनेत टँकरच्या पाण्याची मागणी २८ टक्क्यांनी वाढली आहे. गेल्या वर्षी १२ एप्रिल रोजी राज्यात केवळ ७० गावे आणि २०४ वाड्यांना पाणीपुरवठा करण्यात येत होता. यासाठी केवळ ७५ टँकर होते.

राज्य सरकारने ४० तालुके आणि ११०० हून अधिक मंडलांत दुष्काळ जाहीर केला आहे. त्यामुळे येथे दुष्काळ निवारणाच्या उपाययोजनांची अंमलबजावणी होणे आवश्यक होते. मात्र अजूनही अनेक ठिकाणी पिण्याच्या पाण्याचे दुर्भिक्ष असून, जनावरांच्या पाण्याची सोय करण्यात सरकारला अपयश आले आहे.

पिकांनी टाकल्या माना

राज्यातील धरणांनी तळ गाठण्यास सुरुवात केली आहे. पश्‍चिम महाराष्ट्रात तापमानाचा पारा ४० अंशांवर गेला आहे. एप्रिलच्या मध्यावर वळीव पावसानेही हुलकावणी दिल्याने पाण्याचे भीषण संकट ओढवले आहे. सध्या राज्यातील १८३७ हून अधिक गावे आणि ४३१८ वाड्यांवर तीन हजार टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. भविष्यातील पिण्याच्या पाण्याच्या तरतुदीसाठी सिंचन योजनांवर आधारित पिकांनी माना टाकल्या आहेत. तर अनेक ठिकाणी ती करपून गेली आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.