मंत्रालयातील तसेच राज्यातील शासकीय कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांची कार्यालयीन उपस्थितीची नोंदणी बायोमेट्रिक (Biometric) प्रणालीवर करण्यात येते. सद्या कोरोना (coronavirus) आणि ओमिक्रॉनचे (omicron variant) रुग्ण चांगलेच वाढले आहेत. संसर्गाचा धोका पाहता मंत्रालयातील बायोमेट्रिक प्रणाली तात्पुरती स्थगित करण्यात आली आहे. कोरोना विषाणूच्या ओमिक्रॉन व्हेरियंटमुळे रुग्ण वाढीच्या अनुषंगाने प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून कार्यालयीन उपस्थिती बायोमेट्रिक प्रणाली संदर्भात खालील प्रमाणे सूचना देण्यात येत आहेत.
मंत्रालय व नवीन प्रशासकीय इमारतीच्या कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांची कार्यालयीन उपस्थिती नोदविण्यासाठी बसविण्यात आलेल्या बायोमेट्रिक मशीन पुरेशा प्रमाणात नसल्यामुळे उपस्थिती नोंदविताना होणारी गर्दी व गोंधळ टाळण्यासाठी मंत्रालय व नवीन प्रशासकीय इमारतीच्या प्रत्येक मजल्यावर बायोमेट्रिक (Biometric) मशीन बसविण्याबाबत माहिती तंत्रज्ञान विभागाने १५ दिवसांत कार्यवाही करावी.
मंत्रालय व नवीन प्रशासकीय इमारतीच्या प्रत्येक मजल्यावर बायोमेट्रिक मशीन माहिती तंत्रज्ञान विभागामार्फत बसविण्यात येईपर्यंत मंत्रालय व नवीन प्रशासकीय इमारतीच्या कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांची कार्यालयीन उपस्थितीसाठी बायोमेट्रिक प्रणालीचा वापर पुढील आदेशापर्यत स्थगित करण्यात आला आहे.
मंत्रालय व नवीन प्रशासकीय इमारती व्यतिरिक्त, राज्यातील इतर सर्व शासकीय कार्यालयांमधील अधिकारी व कर्मचारी यांच्या कार्यालयीन उपस्थिती संदर्भात संबंधित कार्यालयामध्ये पुरेशी बायोमेट्रिक मशीन उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने संबंधित कार्यालय प्रमुखांनी आवश्यक ती कार्यवाही तात्काळ करावी. सद्यः स्थितीत बायोमेट्रिक (Biometric) उपस्थिती प्रणालीचा वापर ३१ जानेवारी २०२२ पर्यंत स्थगित करण्यात आला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.