CDS बिपीन रावत अन् पुण्याचे नाते

जनरल रावत हे डिसेंबर 1978 दरम्यान लष्करात अधिकारी म्हणून रूजू झाले होते.
bipin rawat
bipin rawatsakal media
Updated on

पुणे : तामिळनाडूतील कुन्नूरजवळ (India Air force Chopper Crash ) भारतीय वायुसेनेच्या हेलिकॉप्टर अपघातात बुधवारी चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल बिपिन रावत (CDS Bipin Rawat Dies in chopper crash in Kunnur) यांच्यासह 13 जणांचे निधन झाले. जनरल रावत यांचे पुण्याशी (Bipin Rawat Realtion With Pune ) जवळचे नाते होते. रावत हे खडकवासला येथील राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीचे ( Khadakwasala NDA) माजी विद्यार्था होते. त्यानंतर त्यांनी डेहराडून येथून पुढील प्रशिक्षण पूर्ण केले. जनरल रावत हे डिसेंबर 1978 दरम्यान लष्करात अधिकारी म्हणून रूजू झाले होते.

bipin rawat
मधुलिका रावत : राजकन्या ते शहीद जवानांच्या कुटुंबियांचा आधारवड

लष्करात रुजू झाल्यानंतर त्यांनी अनेक महत्वाच्या पदांवर जबाबदाऱ्या पार पडल्या होत्या. त्यात पुण्यातील दक्षिण मुख्यालयाच्या प्रमुखपदाचा ही समावेश होता. जानेवारी 2016 मध्ये त्यांची दक्षिण मुख्याल्याच्या प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. त्यानंतर सप्टेंबर 2016 मध्येच त्यांची लष्कराच्या उपप्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली.

bipin rawat
अशी झाली होती सीडीएस बिपीन रावत यांची जडणघडण

राष्ट्रीय सुरक्षा आणि लीडरशिपवर अनेक लेख

रावत यांनी 'राष्ट्रीय सुरक्षा' आणि 'लीडरशिप' वर अनेक लेख लिहिले असून, ते विविध मासिके आणि प्रकाशनांमध्ये प्रकाशित झाले आहेत. त्यांनी मद्रास विश्वविद्यालयाहून रक्षा अध्ययनात एम. फिल ची डिग्री मिळविली आहे. त्यांनी मॅनेजमेंट आणि कॉम्प्युटर स्टडीजमध्ये डिप्लोमा केला होता. 2011 मध्ये चौधरी चरण सिंह विश्वविद्यालय, मेरठहून त्यांना डॉक्टरेट ऑफ फिलॉसफी (पीएचडी) ने त्यांना सन्मानित केले गेले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.