Shrikant Shinde : पोलिस स्टेशनमध्ये CM शिंदेंच्या लेकाचा वाढदिवस साजरा, फोटो व्हायरल

आनंद परांजपे यांच्या टीकेनंतर ठाणे शहरात शिंदे गट -राष्ट्रवादी यांच्यात वाद निर्माण होण्याची शक्यता
Shrikant Shinde
Shrikant ShindeEsakal
Updated on

खासदार श्रीकांत शिंदे यांचा वाढदिवस ४ फेब्रवारी रोजी होता. त्यानिमित्त त्यांच्यावर विविध ठिकाणांवरुन शुभेच्छांचा वर्षाव झाला. त्यांच्या वाढदिवसाचे पोस्टर ठाण्यातील निवासस्थानासोबत ठिकठिकाणी पाहायला मिळाले. त्यांच्यावर शुभेच्छा देण्यासाठी कार्यकर्त्यांची मोठी गर्दी केली. परंतु त्यांच्या वाढदिवसावरुन आता राजकारण रंगत असल्याची चिन्ह दिसून येत आहेत. त्यांचा वाढदिवस पोलीस ठाण्यात साजरा झाला. यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व शहराध्यक्ष आनंद परांजपे यांनी खोचक टीका केली आहे.

खासदार श्रीकांत शिंदे यांचा वाढदिवस ठाण्यातील पोलिस स्टेशनमध्ये करण्यात आला आहे. पोलीस ठाण्यात केक कापण्यात आला. उपायुक्त गणेश गावडे यांनी त्यांना केक भरवला. या प्रकारावर राष्ट्रवादी काँग्रसने टीका केली आहे. त्यावरुन राष्ट्रवादी काँग्रेसने आक्रमक पवित्रा घेतली आहे. शहराध्यक्ष आनंद परांजपे यांनी खोचक टीका केली आहे.

Shrikant Shinde
Sharad Pawar : …तर शरद पवार समशुद्दीन अन् अजित पवार अजदुद्दीन झाले असते… भाजप नेत्याची टीका

आनंद परांजपे म्हणाले की, खासदार श्रीकांत शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त पोलीस ठाण्यात स्तुत्य उपक्रम झाला. केक कापण्यात आला. केक एकमेकांना भरवण्यात आला. गणवेश वाटप झाले. यामुळे पोलीस महासंचालक रजनीश शेठ व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मी पत्र लिहिणार आहे. या पत्रात पोलीस ठाण्यात सर्वच राजकीय नेत्यांचे वाढदिवस साजरे करण्याची परवानगी देण्याची मागणी देखील करणार आहे.

Shrikant Shinde
Prithviraj Chavan : काँग्रेसच्या अंतर्गत राजकारणावर पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, काँग्रेसमध्ये…

पुढे ते म्हणाले की, पोलिसांना गणवेश वाटप सरकारकडून केले जाते. त्यांना त्यासाठी धुलाई भत्ताही दिला जातो. त्यांच्या सर्व्हीस बुका दिल्या जातात. परंतु राजकीय नेत्यांकडून गणवेश मिळत असतील तर राज्य सरकारचा खर्च वाचेल. यामुळे सरकारने पोलीस ठाण्यात वाढदिवस साजरा करणे व गणवेश वाटप करण्याची परवानगी राजकीय पक्षांना द्यावी. म्हणजे राष्ट्रवादी पक्ष ठाणे शहरात हा उपक्रम राबवेल. त्यानंतर भाजप आणि काँग्रेस इतर ठिकाणी हा उपक्रम राबवेल.

तर या प्रकारामुळे पोलिसांच्या विश्वासार्हतेवर प्रश्न निर्माण होत आहे. प्रत्येक ठाणेकरांचा मनात या बाबत प्रश्न असणार आहे असंही आनंद परांजपे यांनी म्हंटलं आहे.

Shrikant Shinde
Kasaba Bypoll: टिळकांना उमेदवारी देतो, दोन्ही निवडणूका बिनविरोध करा? चंद्रकांत पाटलांची गुगली

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.