शिवसेनेतील बंडखोरी आणि राज्यातील बदलते राजकारण याचा प्रत्यक्ष अनुभव आपण मागील दिवसांमध्ये घेतला. शिवसेना आमदारांचा एक मोठा गट फुटल्याने उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकार कोसळले. त्यानंतर गेल्या वर्षभरात राज्याच्या राजकारणात अनेक उलतापालथी झाल्या. यात आता शिवसेना संपली असल्याची चर्चाही सुरू झाली. पण स्वत:चे आजारपण असो की पक्षातल्याच नेत्यांची बंडखोरी असो, उद्धव ठाकरे यांची लढाई न डगमगता आजही कायम आहे.
पण तुम्हाला माहिती आहे का, त्यांची ही लढाईवृत्ती आजचीच नाही. या आधीही अशा अनेक कठिण प्रसंगासमोर त्यांनी कधीही हार मानली नाही. अशाच तीन गाजलेल्या किस्स्यांबाबत आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत (birthday special: Uddhav Thackeray never give up read here these three stories)
पहिला किस्सा
1996-1997ची ही गोष्ट. राज ठाकरेंना बॅडमिंटन शिकायचं होतं त्यासाठी ते दादरला रोज सरावासाठी जायचे. त्यानंतर त्यांनी उद्धव ठाकरेंना खेळायला बोलावलं आणि उद्ध ठाकरे गेले पण. एकदा खेळताखेळता उद्धव ठाकरे पडले. तेव्हा राज ठाकरे आणि त्यांचे काही मित्र उद्धव ठाकरे यांच्याकडे बघून हसू लागले. या घटनेनंतर उद्धव ठाकरे यांनी सराव बंद केला. पण हा फक्त सगळ्यांचा गैरसमज होता.
उद्धव ठाकरेंनी सरावासाठी चक्क दुसरा कोर्ट बुक केला होता. बॅडमिंटन शिकण्यासाठी राज ठाकरे यांचा जो कोच होता, तोच उद्धव ठाकरे यांचा कोच होता. असंच एकदा त्याच कोचनं सांगितलं होतं की, उद्धव ठाकरे आता इतकं उत्तम बॅडमिंटन खेळतात की ते आम्हालाही हरवू शकतात. या किस्स्यावरुन उद्धव ठाकरे यांची जिद्द आणि हार न मानन्याची चिकाटी दिसून येते.
दुसरा किस्सा
२००५ हे शिवसेनेसाठी सर्वात वाईट वर्ष होते. दोन दिग्गज नेते नारायण राणे आणि राज ठाकरे यांनी शिवसेना पक्षाला रामराम ठोकला होता. २००५ या वर्षी राणे शिवसेनेतून बाहेर पडले. या आधी १९९२ ला छगन भुजबळ १८ सहकाऱ्यांसह बाहेर पडले होते. १९९२ नंतर शिवसेनेसाठी हा दुसरा मोठा झटका होता. नारायण राणे बाहेर पडले तेव्हा उभ्या महाराष्ट्राने पाहिलं की नारायण राणे व उद्धव ठाकरे यांचं जमत नव्हतं, खटके उडत होते. बाळासाहेब ठाकरे त्यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न करत होते. परंतू त्याने नारायण राणे यांचं समाधान झालं नाही. म्हणून त्यांनी टोकाची भूमिका घेत अखेर शिवसेना सोडली.
पण त्या पाठोपाठ राज ठाकरेंही आपसी मतेभेदामुळे २००५मध्ये शिवसेनेतून बाहेर पडले. त्यावेळी राज ठाकरे यांना शिवसेनेचं उज्वल भवितव्य म्हणून पक्षात स्थान होतं. हा शिवसेनेसाठी खूप मोठा झटका होता. अशातच शिवसेनेसमोरचं आव्हान तेव्हा आणखी वाढलं जेव्हा राज ठाकरे यांनी स्वत:चा पक्ष उभा केला. त्याच नावं होतं महाराष्ट्र नवनिर्माण सेना.
त्यानंतर शिवसेनेला एकप्रकारे उतरती कळा लागली होती. २०१२मध्ये बाळासाहेबांच्या निधनानंतर तर सगळ्यांना वाटलं की उद्धव ठाकरे संपले आणि शिवसेनाही संपली. पण अशा कठिण काळातही उद्धव ठाकरेंनी शिवसेनेची ताकद कमी होऊ दिली नाही आणि पक्षाचा विस्तार केला.
तिसरा किस्सा
हा किस्सा 2019 सालच्या निवडणुकीचा. निवडणुकीच्या निकालानंतर भाजपसोबत शिवसेनेची बोलणी फिस्कटली आणि मुख्यमंत्री पदाच्या वादावरुन दोन पक्षात वादाची ठिणगी पेटली होती. यात ट्वीस्ट तेव्हा आला जेव्हा देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचा पहाटेला शपथविधी झाला. एवढ सगळं घडत होत पण उद्धव ठाकरे डगमगले नाहीत. आणि अखेर हार न मानता त्यांनी सत्ता स्थापन केली. आणि राज्याचे मुख्यमंत्री झाले.
हे होते उद्धव ठाकरे यांच्या जिद्दीचे आणि कधीही हार न मानन्याचे उत्तम उदाहरणे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.