Nitin Desai Death Case : "धक्कादायक माहिती मिळतेय, लवकरच खुलासा करेन..."; शेलारांचा मोठा दावा

BJP ashish shelar big Claim in Nitin Desai Suicide Case ND Studio
BJP ashish shelar big Claim in Nitin Desai Suicide Case ND Studio
Updated on

Nitin Desai Death : प्रख्यात कलादिग्दर्शक नितीन देसाई त्यांच्या आत्महत्येने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. यादरम्या भाजपचे नेते आशिष शेलार यांच्या विधानामुळे वेगळ्याच चर्चांना उधाण आलं आहे. माझ्याकडे धक्कादायक माहिती येत आहे. मी ती योग्य वेळे मांडेल, असं वक्यव्य भाजप नेते आशिष शेलार यांनी केलं आहे.

आशिष शेलार यांनी जे. जे. रुग्णालयात जाऊन आज नितीन चंद्रकांत देसाईयांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतले. यावेळी त्यांच्यासोबत उपमुख्यमंत्री अजित पवार, पर्यटन मंत्री तथा मुंबईचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा हेदेखील उपस्थित होते.

दरम्यान नितीन देसाई आत्महत्या प्रकरणावर बोलताना शेलार यांनी काही महत्वाचे मुद्दे उपस्थित केले. शेलार म्हणाले की, ज्या पद्धतीने एडेलवाईज त्याची ARC, रसेश शहा या मंडळीचा ट्रॅक रेकाॅर्ड आहे, त्यानुसार कालपर्यंत माझ्याकडे दोन प्रकरण होती. योग्य कायद्याचा अयोग्य पद्धतीने वापर करून कर्ज देणे आणि पिळवणूक करणे, आज त्याची चार प्रकरण झाली आहेत.

BJP ashish shelar big Claim in Nitin Desai Suicide Case ND Studio
Maharashtra Crime : "दरदिवशी ७० मुली गायब होतायत, हे खरं नाहीये"; महिलांच्या सुरक्षेबाबत फडणवीसांनी सांगितली आकडेवारी

त्यांचा बोलविता धनी कोण?

शेलार पुढे बोलताना म्हणाले की, रसेश शहा आणि एडेलवाईज यांचा हेतू नेमका काय? मराठी माणसाचा उभा केलेला स्टुडिओ गिळंकृत करण्यासाठी हा हेतू होता का? याची चौकशी झाली पाहिजे. तो स्टुडिओ रसेश शहा यांच्याकडून दुसरा कोणी विकत घेणार होता का? याची बोलणी झाली होती का? म्हणून तो विकत घेणारा त्यांच्या इशाऱ्यावर एडेलवाईज आणि रसेश शहा दबाव टाकत होते का? त्यांचा बोलविता धनी कोण? याचा आम्ही शेवटपर्यंत पाठपुरावा करु.

BJP ashish shelar big Claim in Nitin Desai Suicide Case ND Studio
Jalgaon Crime : जळगाव हादरलं! अल्पवयीन मुलीवर अत्याचार करत दगडानं हत्या; चिमुरडी दोन दिवसांपासून होती बेपत्ता

यांच्या मागे मोठी मंडळी...

आशिष शेलार यांनी या प्रकरणामागे मोठी व्यक्ती असल्याचे म्हटले आहे. माझ्याकडे धक्कादायक माहिती येत आहे. मी ती योग्य वेळे मांडेल. यांच्या मागे मोठी मंडळी आहेत. याचा मी वेळ आल्यावर खुलासा करेल, असे देखील आशिष शेलार म्हणाले आहेत. त्यामुळे शेलारांचा रोख नेमका कोणाकडे याबद्दल चर्चांना उधाण आले आहे.

प्रख्यात कलादिग्दर्शक नितीन देसाई यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. दुपारी ४ वाजता त्यांच्या कर्जत येथील एन.डी स्टुडिओत हे अंत्यसंस्कार पार पडतील. तर दुपारी १२ ते २ या काळात त्यांचं अंत्यदर्शन घेता येणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.