Chandrashekhar Bawankule : 'सावरकरांनी 50 वर्षे शिक्षा भोगली, राहुल गांधी एक तास कारागृहात राहु शकत नाहीत'

राज्यातील 288 मतदारसंघांत भाजप आणि शिवसेना यांच्या वतीनं 'सावरकर गौरव यात्रा' (Savarkar Gaurav Yatra) काढण्यात येणार आहे.
Chandrashekhar Bawankule
Chandrashekhar Bawankuleesakal
Updated on
Summary

लंडनमध्ये क्रांतीवीरांना मदत करताना सावरकरांना अटक करण्यात आली होती. दोन जन्मठेपेच्या शिक्षा त्यांनी सुमारे ५० वर्षे भोगल्या.

Chandrashekhar Bawankule News : राज्यातील 288 मतदारसंघांत भाजप आणि शिवसेना यांच्या वतीनं 'सावरकर गौरव यात्रा' (Savarkar Gaurav Yatra) काढण्यात येणार आहे. या यात्रेत सर्व नेते, पदाधिकारी, बूथ कमिटीचे सदस्य सहभागी होणार आहेत, अशी माहिती भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.

ते माध्यमांशी संवाद साधत होते. बावनकुळे म्हणाले, 'देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात स्वातंत्र्यवीर सावरकरांचं (Vinayak Damodar Savarkar) मोठं योगदान आहे. हे नाकारुन चालणार नाही. सावरकरांचं हे योगदान १३० कोटी भारतीय कधीच विसरु शकत नाहीत.'

Chandrashekhar Bawankule
Smriti Irani : 'कोर्टानं राहुल गांधींना 'या' कारणामुळं ठरवलं दोषी'; स्मृती इराणी स्पष्टच बोलल्या

मदनलाल धिंगरा हे सावरकरांचे पहिले हुतात्मा शिष्य होते. अनेक क्रांतीवीरांनी सावरकरांसोबत येऊन स्वातंत्र्य लढ्यात सहभाग घेतला. १८५७ चा उठाव झाला होता. या उठावाचा इतिहास कोणी लिहिला तर स्वातंत्र्यवीर सावरकरांनी लिहिला, असं बावनकुळेंनी सांगितलं.

Chandrashekhar Bawankule
Atiq Ahmed : निकालाआधीच अतिक अहमदला मोठा झटका; सुप्रीम कोर्टानं 'ही' याचिका फेटाळली

लंडनमध्ये क्रांतीवीरांना मदत करताना सावरकरांना अटक करण्यात आली होती. दोन जन्मठेपेच्या शिक्षा त्यांनी सुमारे ५० वर्षे भोगल्या. हे सांगताना त्यांनी राहुल गांधींवर टीका केली. राहुल गांधी कारागृहात एक दिवस राहु शकत नाही, एक तास राहु शकत नाही, असा त्यांनी निशाणा साधला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.